The Most Unique Village In The World Where Children Cannot Play Outside Nrab
जगातील सर्वात अनोखे गाव, जिथे मुलांना घराबाहेर खेळता येत नाही ; जाणून घ्या काय आहे कारण
जगात अशी अनेक गावे आहेत, जी या ना त्या कारणाने प्रसिद्ध आहेत. काही त्यांच्या सौंदर्यासाठी तर काही स्वच्छतेसाठी ओळखले जातात, पण काही गावे अशी आहेत जी जगाच्या इतर भागांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहेत.
जगात अशी अनेक गावे आहेत, जी या ना त्या कारणाने प्रसिद्ध आहेत. काही त्यांच्या सौंदर्यासाठी तर काही स्वच्छतेसाठी ओळखले जातात, पण काही गावे अशी आहेत जी जगाच्या इतर भागांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहेत. ज्यांच्याबद्दल जाणून घेतल्यानंतर लोक आश्चर्यचकित होतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका ठिकाणाविषयी सांगणार आहोत जे खूप गूढ आहे. कारण ही अशी जागा आहे जिथे मुलांना घराबाहेर खेळण्याची परवानगी नाही. इथे राहणारी प्रत्येक आई आपल्या मुलांना घरात ठेवते. म्हणजे इथे मुलांना घरा बाहेर जाण्यावर पूर्ण बंदी आहे.
साधारणपणे, जिथे पालक आपल्या मुलाचा शारीरिक विकास व्हावा म्हणून मुलांना बाहेर खेळायला पाठविण्यासाठी प्रयत्न करतात, परंतु युनायटेड किंगडममधील नॉर्विच जिल्ह्यात थार्प हॅम्लेट नावाचे एक गाव आहे. जिथे प्रत्येक पालक आपले मूल घरात राहावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो. आता तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच निर्माण होत असेल की इथे इतकं काय आहे की ज्यामुळे इथे मुलांना घराबाहेर पडू दिलं जात नाही. चला जाणून घेऊया या गावाबद्दल…
असं काय आहे या गावात
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे गाव अशा ठिकाणी वसले आहे जे पूर्णपणे असुरक्षित आहे. इथे राहणाऱ्या प्रत्येक पालकाच्या मनात एक भीती कायम असते की थोडीशीही चूक झाली तर मुलं थेट जमिनीत खोलवर जातील.म्हणूनच पालक मुलांना खेळायला घराबाहेर पडू देत नाहीत. प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार, या गावातील घरांच्या बाहेरील रस्त्यांवर अनेक खड्डे आहेत, जे इतके खोल आहेत की त्यांच्या आत कोणीही जाऊ शकत नाही असे सांगितले जाते.
या गावातील एका व्यक्तीच्या बागेतील एक झाड बेपत्ता झाल्याने गावातील लोकांना येथील सिंकहोलची माहिती मिळाली. त्यानंतर ही बातमी प्राधिकरणापर्यंत पोहोचल्यानंतर खड्ड्यांच्या बाजूने रेझिस्टन्स लावण्यात आले आहे. मात्र ही प्रक्रिया थांबली नाही, रोज एक ना एक अपघाताचे बळी ठरत आहेत.सध्या या गावात 12 फूट खोल खड्डा तयार झाला असून त्यामुळे ग्रामस्थांच्या अडचणीत आणखीनच भर पडली आहे. या परिसराच्या संरक्षणासाठी सरकारने पावले उचलावीत, असे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे.
Web Title: The most unique village in the world where children cannot play outside nrab