देशात कोरोनाचा प्रादूर्भाव मोठ्या संख्येने होत आहे. गेल्या २४ तासांत देशात ४८ हजार ४९३ इतक्या नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली असून काल दिवसभरात मृतांचा आकडा ७६८ वर पोहोचला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा १५ लाख ३१ हजारांवर पोहोचला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोनाचे ५ लाख ९ हजार ४४७ इतके अँक्टिव्ह रूग्ण आहेत. तसेच ९ लाख ८८ हजार २९ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहेत. त्याचप्रमाणे ३४ हजार १९३ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात ४ लाख चाचण्या झाल्या आहेत तर आतापर्यंतचा चाचण्यांचा आकडा हा १.७ कोटींवर पोहोचला आहे. आज देशात १० लाख रुग्ण निरोगी होण्याच्या मार्गावर आहेत.
Total number of #COVID19 cases in India is now 15.31 lakh; 768 deaths in the last 24 hours pic.twitter.com/4eNV6BNPjq
— ANI (@ANI) July 29, 2020
महाराष्ट्र राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ३ लाखांच्या वर गेली असून, १० हजार ३३३ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच देशातील महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकात सर्वात जास्त कोरोना रुग्ण सापडले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट ६४.२३ इतका झाला आहे.