मुंबई : अन्न वितरण हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अत्यंत आवश्यक भाग बनला आहे. जेव्हा जेव्हा आपल्याला भूक लागते किंवा आपल्या आवडत्या अन्नाची इच्छा असते तेव्हा आपण आपला फोन काढतो आणि ते पदार्थ थेट ऑर्डर करतो. आपल्याला हवा असलेला पदार्थ काही मिनिटांत आपल्यापर्यंत पोहोचते. भारतीयांचे अनेक आवडते खाद्यपदार्थ आहेत जे दरवर्षी फूड एग्रीगेटर ऍप्लिकेशनवर अव्वल क्रमांकावर असतात, त्यापैकी बिर्याणी (Biryani) अव्वल क्रमांकावर आहे. स्विगी (Swiggy) च्या वार्षिक ट्रेंड रिपोर्टची 7 वी आवृत्ती नुकतीच प्रसिद्ध झाली आहे आणि यात बिर्याणी २०२२ मधील सर्वाधिक ऑर्डर केली गेलेली डीश ठरली आहे.
अहवालानुसार, चिकन बिर्याणी सलग सातव्या वर्षी अॅपवर सर्वाधिक ऑर्डर केलेली डिश म्हणून चार्टमध्ये अव्वल स्थानावर आहे. स्विगीने गुरुवारी शेअर केलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, “डिशने आपली ‘खरी ताकद’ दर्शविली आणि प्रति मिनिट 137 बिर्याणी ऑर्डर केल्या गेल्या. ग्राहकांनी प्रति सेकंद 2.28 बिर्याणीची ऑर्डर केली.”
चिकन बिर्याणीनंतर, स्विगीवर सर्वाधिक ऑर्डर केलेले टॉप पाच पदार्थ म्हणजे मसाला डोसा, चिकन फ्राईड राइस, पनीर बटर मसाला आणि बटर नान. दरम्यान, गुलाब जामुन हे आवडते गोड म्हणून सर्वाधिक ऑर्डर केले गेले.
‘या’ खाद्यपदार्थांनाही मागणी :
बहुतेक बिर्याणीमध्ये चिकन बिर्याणी, मसाला डोसा, चिकन फ्राईड राईस, पनीर बटर मसाला, बटर नॉन, व्हेज फ्राईड राईस आणि तंदूरी चिकन यांचा समावेश होतो. यंदा भारतीयांनीही इटालियन पास्ता, पिझ्झा, मेक्सिकन बाऊल, सुशी असे खाद्यपदार्थ ऑर्डर केले. अनेक भारतीयांनी रॅव्हिओली (इटालियन) आणि कोरियन पदार्थांसारख्या परदेशी फ्लेवर्सची ऑर्डर दिली.
या वर्षी सर्वाधिक ऑर्डर केलेल्या 10 खाद्यपदार्थांमध्ये समोसाही आहे. यावर्षी सुमारे 40 लाख समोसे ऑर्डर करण्यात आले आहेत. समोशाशिवाय टॉप-10 फूडमध्ये पॉपकॉर्न, पावभाजी, फ्रेंच फ्राय, गार्लिक ब्रेडस्टिक यांचा समावेश आहे. मिठाईंमध्ये गुलाब जामुन ही सर्वात जास्त ऑर्डर केली. यावर्षी 27 लाख गुलाब जामुनच्या ऑर्डर होत्या. यामध्ये 16 लाख रसमलाई आणि 10 लाख चोको लावा केक, रग्गुल्ला, चोकोचिप्स आईस्क्रीम, काजू कतली यांचा समावेश होता.