कोल्हापूर : मराठा आरक्ष रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयान दिल्यानंतर राज्यात मराठा समाजातून संताप व्यक्त केला जात आहे. तरुणांमध्ये अस्वस्थता असून त्यांना नोकरीची चिंता आहे. आता यावर संभाजीराजे छत्रपती यांनी मंगळवारी एक ट्विट केलं होतं. त्याबाबत बोलताना संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं की,”राज्याचे अधिकार काढून घेतले का ? केंद्र सरकारने घेतलेली भूमिका यावर सगळं बोलणार आहे. पण सध्या कोरोनाची महामारी थांबविणे गरजेचे आहे. आत्ताही माझी भूमिका सामंजस्य आहे.’
संभाजीराजे यांनी काय म्हटलं ?
आरक्षणासाठी आता मोर्चे काढण्याची, उद्रेक काढण्याची वेळ नाही. सध्या कोरोनाचं संकट रोखण्याची गरज आहे, आपण जगलो तर आरक्षणाचा लढा लढू शकतो. मराठा समाजात नाराजी, अस्वस्थता आहे त्यावर मी लवकरच बोलणार आहे. आऱक्षणासाठी नेत्यांना भेटायची गरज नाही, मराठा आरक्षण अभ्यासक, गायकवाड न्यायाधीश यांची भेट घेणार असल्याचंही संभाजीराजेंनी सांगितलं. तसेचं संभाजीराजेंनी मराठा आरक्षणाबाबत लवकरच भूमिका जाहीर करू असं ट्विट केलं होतं. त्याबाबत संभाजीराजे म्हणाले की,”काल ट्विट यासाठी केलं की मराठा समाजात संभ्रम अवस्था आहे. कोर्टाचा निकाल आल्यावर राजकीय वातावरण गरम झालंय. थोड्याच दिवसांतच माझी आणि समाजाची भूमिका जाहीर करणार आहे. त्याआधी समाजाशी आणि तज्ज्ञांची चर्चा करून भूमिका मांडणार आहे.”
[read_also content=”पॉझिटिव्ह केसेस वाढवण्यावर भर द्या… मोदींची ती चूक काँग्रेसने पकडली, व्हिडीओ झाला व्हायरल https://www.navarashtra.com/latest-news/focus-on-increasing-the-number-of-positive-cases-modis-mistake-was-caught-by-the-congress-the-video-went-viral-nrdm-131059.html”]
दरम्यान आरक्षणावर सगळं सविस्तर सांगतो. माझी भूमिका म्हणजेच शाहू महाराजांची भूमिका आहे. प्रत्येक राजकीय पक्षांकडून वेगवेगळी भूमिका घेण्यात आली आहे. त्यांची आणि माझी भूमिका वेगळी आहे. माझी भूमिका वैयक्तिक नसणार आहे. यावर लवकरच भाष्य करू असं संभाजीराजे म्हणाले आहेत.