मुंबई : सोशल मिडियावर झालेल्या मैत्रीनंतर मॉडेल खुशबू अगरवालने आपला टिकटॉक स्टार मित्र अभिमन्यू गुप्ताला तिच्या घरी राहण्याची परवानगी दिली होती. अभिमन्यूला दुसरीकडे भाड्याने घर मिळेपर्यंत आपल्याच फ्लॅटमध्ये राहण्याची परवानगी दिली होती.
अभिनेत्री कामानिमित्त नेहमी घराबाहेर असायची याचाच फायदा टिकटॉक स्टार मित्राने घेतला आणि घरात चोरी केली. या चोरीबाबत अभिनेत्री खुशबूला १ जानेवारी नंतर कळाले. मागील महिन्यात मॉडेल कामानिमित्त काही दिवसांसाठी परदेशात गेली होती. याच संधीचा फायदा घेत आरोपी टिकटॉक स्टार मित्राने घरातील रोकडसह ४ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. हा सर्व प्रकार मॉडेलच्या लक्षात उशीरा १ जानेवारीनंतर आला.
[read_also content=”मुंबईच्या महापौरांना जीवे मारण्याची धमकी, महापौरांना सत्य बाहेर येण्याची खात्री https://www.navarashtra.com/latest-news/threat-call-to-bmc-mayor-nraj-73780.html”]
घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर तिला मित्र अभिमन्यूवर संशय आला. कारण अभिमन्यूशिवाय इतर कोणीच घरी ये जा करत नसल्याने तिचा संशय अभिमन्यूवर होता. मॉडेलने अभिमन्यूला खडसावून विचारले असता त्याने चोरी केली असल्याचे कबूल केले. यानंतर तिने संबंधित घटनेबाबत पोलिसांत तक्रार केली.
पोलिसांनी केलेल्या तपासात सोसायटीच्या सीसीटीव्हीत आरोपी बुरखा घालून प्रवेश करत असल्याचे दिसले. बुरखा घातलेल्या व्यक्तीच्या पायातील शुज हे अभिमन्यूचे असल्याचे मॉडेलने सांगितले. पोलिसांनी अभिमन्यूला अटक केल्यानंतर चौकशीत त्यानेच चोरी केली असल्याचे कबूल केले आहे. दरम्यान त्याने चोरी केलेला ऐवज आणि रोख रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे.