अमरवाती Amravati जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर Minister Yashomati Thakur यांच्याकडे तिवसा शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्याच्या तक्रारी, सफाईकामांत नियमितता नसल्याच्या तक्रारी, पीण्याचा गढुळ पाण्याच्या तक्रारी सतत येत होत्या. त्यामुळे पालकमंत्र्यांनी या तक्रारींची दखल घेत नगरपंचायतीला भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी त्यांना तिवसा नगरपंचायतीने Tivasa Nagar Panchayat तब्बल ७२ लाख रुपये कंपाउंड वॉल बांधण्यासाठी खर्च केल्याचे निदर्शनास आले.
आढावा बैठक तिसवा नगरपंचायतीच्या कार्यालयात होणार असं नियोजन होतं. त्याप्रमाणे यशोमती ठाकूर तिथं दाखल झाल्या. मात्र, यावेळी त्यांना नगरपंचायतीच्या कार्यालयातच अस्वच्छता असल्याचं दिसून आलं. “काय हे एवढी घाण? की मी आल्यावर मी साफ करु हे सर्व? तुमच्याकडे दुसरी रुम नसली तरी सर्व पसारा एका कोपऱ्यात राहू शकतो. एवढ्या घाणीत तुम्ही बसुच कसे शकता? तुमचं कार्यालयच एवढ घाण असेल तर डेंग्युचे पेशंट वाढणारचं.” असं म्हणत तिथल्या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं.
स्वच्छतेसाठी केलेल्या खर्चाचा आढावा घेताना यशोमती ठाकूर यांना नगरपंचायतीने तब्बल ७२ लाख रुपये कंपाउंड वॉल बांधण्यासाठी खर्च केल्याचे निदर्शनास आले. यावेळी त्यांनी “७२ लाखांत तर अर्धी इमारत होते. पुढच्या वर्षी आजून थोडा निधी दिला असता तर पुर्ण बिल्डींगच बनवून झाली असती. अरे स्वत:चं घर चालवता तसं चालवा की. आपण घरात बचत करतो ना? एक महिन्यांत एवढे पैसे का वाया घालवले? एक महिनाभर तुम्ही काय केलंत ऐश?” असं म्हणत तिथल्या अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं.
पीण्याचे पाणी खराब येत असल्याची तक्रार नागरिकांनी केली केली होती. त्याचा आढावा घेताना त्या म्हणाल्या की, “एवढे पैसे तुमच्याकडे आहेत मग तुम्ही पाण्याला का नाही दिलं? हे घ्या हे पाणी प्या तुम्ही.. एवढ गढूळ पाणी तुम्ही नाही पीणार मग या लोकांनी का प्यायंच?”
पालकमंत्र्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्याधिकारी पल्लवी सोटे म्हणाल्या की, “मॅडम आपल्याकडे पाणी शुध्द करण्याची यंत्रणाच अस्तीत्वात नाही. आणि हि यंत्रणा मी कशी टाकू शकणार?”
मुख्याधिकाऱ्यांच्या या उत्तरावर पालकमंत्री चांगल्याच भडकल्या व त्यांनी “म्हणजे तु दुधाने धुलेली आहेस. ७२ लाख रुपये नको त्या गोष्टीवर खर्च करता तुम्ही त्या ठिकाणी ७२ लाखांत काहीच झालं नसतं?” असं म्हणत मुख्याधिकारी पल्लवी सोटे यांना चांगलंच फैलावर घेतलं.
तिवसा शहरात सफाईकामांत नियमितता नाही. डेंग्यूचे रूग्ण वाढत असल्याच्या सतत तक्रारी येत आहेत. स्वच्छता व आरोग्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून नागरिकांच्या जीवाशी खेळू नका. बेजबाबदारपणे वागल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी नगरपंचायत प्रशासनाला दिला.
Tivasa Nagar Panchayat built a compound wall worth Rs. 72 lakhs Minister Yashomati Thakur got angry