घटना.
१४०२ : तैमूरलंगने तुर्कस्तानमधील अंकारा शहर जिंकले.
१८०७ : निकेफोरे नीएपस यांना जगातील पहिल्या इंजिनसाठी पेटंट दिले गेले.
१८२८ : मुंबापूर वर्तमान हे मराठी वृत्तपत्र मुंबईत सुरू झाले.
१८७१ : ब्रिटिश कोलंबिया हा प्रांत कॅनडात विलीन झाला.
१९०३ : फोर्ड मोटर कंपनीतून पहिली मोटारगाडी बाहेर पडली.
१९०८ : बडोद्याचे महाराज सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांच्या पुढाकाराने ‘बँक ऑफ बडोदा’ची स्थापना झाली.
१९२६ : मेथॉडिस्ट चर्चने स्त्रियांना धर्मगुरू होण्याची परवानगी दिली.
१९४४ : दुसरे महायुद्ध– क्लाऊस व्हॉन स्टाऊफेनबर्गने केलेल्या प्राणघातक हल्ल्यातुन अॅडॉल्फ हिटलर बचावला.
१९४९ : इस्त्रायल व सीरीयाने शांतता करार केल्यामुळे १९ महिने सुरू असलेले युद्ध संपले.
१९५२ : फिनलंडची राजधानी हेलसिंकी येथे १५ व्या ऑलिम्पिक खेळांना सुरूवात झाली.
१९६० : सिरिमावो भंडारनायके श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी.
१९६९ : नील आर्मस्ट्राँग हा चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव ठरला.
१९७३ : केनियाचे अर्थमंत्री ज्युलियस कियानो यांनी जाहीर केले की देशातील आशियाई लोकांचे उद्योग-धंदे वर्षअखेरीस सक्तीने बंद करण्यात येतील.
१९७६ : मंगळावर प्रथमच व्हायकिंग-१ हे मानवरहित अंतराळयान उतरले.
१९८९ : म्यानमारच्या सरकारने ऑँग सान सू कीला नजरकैदेत टाकले.
२००० : अभिनेते दिलीपकुमार यांना राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार जाहीर.
२०१५ : पाच दशकांनंतर अमेरिका आणि क्युबा यांच्यामध्ये राजनयिक संबंध पुन्हा सुरू झाले.