Khamenei Death : एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं! खामेनेईंसह संपूर्ण कुटुंबाचा खात्मा? सॅटेलाईट फोटोंना उडवली खळबळ (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिका-इस्रायलने (Israel) इराणवर संयुक्तपण लष्करी कारवाई केली होती. दरम्यान या कारवाईत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय त्यांचे संपूर्ण कुटुंबही या हल्ल्यात मृत्यूमुखी पडले असल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायलच्या भयावह हल्ल्यात खामेनेई यांची मुलगी, जावई, सून आणि निरापराध नातवाचा मृत्यू झाला आहे. इराणी सरकार आणि माध्यमांनी याची पुष्टी केली आहे.
शनिवारी (२८ फेब्रुवारी २०२६) सकाळी इस्रायलने इराणवर (Iran)भीषण हल्ला केला होता. या हल्ल्यात सुरुवातील इराणच्या मुख्य कार्यलयाला आणि अणु केंद्रांना नष्ट करण्यात आले. राजधानी तेहरानसह देशाच्या १० प्रमुख शहरांमध्ये इस्रायलने हल्ले केले होते. या हल्ल्यांची तीव्रताा इतकी होती की इराणमधील इमारतीं ढिगाऱ्यात रुपांतरित झाल्या. क्षणात सर्व काही उद्ध्वस्त झाले होते. अधिकृत माहितीनुसार, खामेनेईंसह त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी एक निवेदन जारी केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, खामेनेई यांचे गुप्त ठिकाण पूर्ण उद्ध्वस्त झाले आहे. एका इस्रायली अधिकाऱ्याने खामेनेईंचा मृतदेह इमारतींच्या मलब्याखालून जप्त करण्यात आला असल्याचे म्हटले आहे. याचे सॅटेलाईट्स फोटो देखील जारी करण्यात आले असून यामध्ये खामेनेईंच्या निवासस्थान पूर्णपणे नष्ट झाल्याचे दिसत आहे.
डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूची माहिती सोशल मीडियावरु दिली. त्यांनी ट्रुथ सोशल मीडियावर म्हटले की, इतिहासातील सर्वात क्रूर व्यक्ती मारली गेली आहे, हा इराणसाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी मोठा न्याय आहे.
ट्रम्प यांनी इराणला शस्त्रे सोडण्याचे आणि अमेरिकेशी हातमिळवणी करण्याचे आवाहन केले आहे. सध्या इराणमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. तसेच इस्रायलचे भीषण हल्ले देखील सुरुच आहे. खामेनेईंच्या मृत्यूने संपूर्ण जगाला हादरवून टाकले आहे.
Ans: इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा अंत झाला आहे.
Ans: इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी खामेनेई यांचे गुप्त ठिकाण पूर्ण उद्ध्वस्त झाले असल्याचे सांगितले आहे.
Ans: इस्रायली अधिकाऱ्याने खामेनेईंचा मृतदेह इमारतींच्या मलब्याखालून जप्त करण्यात आला दावा केला आहे.






