उत्तर प्रदेशातील कुख्यात माफिया मुख्तार अन्सारी (Mukhtar Ansari) याचा हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. आज त्याच्यावर गाझीपूर जिल्ह्यातील मुहम्मदाबाद येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार (Mukhtar Ansari Funeral )करण्यात आले. यावेळी स्मशानभूमीत फक्त कुटुंबीयांनाच प्रवेश देण्यात आला होता. कडक सुरक्षा व्यवस्थेत अन्सारीला अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बाहेर समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. स्मशानभूमीत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला.
[read_also content=”उष्माघातापासून स्व:ताचा कसा कराल बचाव? सरकारकडून सूचना जारी, राज्यात उष्माघाताचे आढळले 13 रुग्ण https://www.navarashtra.com/maharashtra/tips-to-prevent-heat-stroke-maharashtra-government-issue-guidelines-nrps-519035.html”]
मुख्तार यांच पार्थिव गाझीपूर जिल्ह्यातील मुहम्मदाबाद येथील त्यांच्या वडिलोपार्जित निवासस्थानी आणण्यात आलं होत. आज सकाळी त्याच्यावर अत्यसंस्कार पार पडले. अंत्ययात्रेत हजारो लोक सहभागी झाले होते. मुलगा उमरने वडिलांवर अत्यंसंस्कार केलेत. यावेळी समर्थकांनी मुख्तार अन्सारी जिंदाबादच्या घोषणा देण्यास सुरुवात केली.
मुख्तार अन्सारीच्या अंत्यसंस्काराला मोठी गर्दी झाली होती. अंत्यसंस्कार करण्यापूर्वी मशिदीत झालेल्या नमाजाच्या वेळी समर्थक मोठ्या संख्येने घोषणा देत होते. मुख्तार अन्सारीचा शेवटचा प्रवासही लोक आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करत होते. समर्थकही त्यांच्या मोबाईलवरून अन्सारीच्या शेवटच्या प्रवासाचे फोटो काढत होते आणि रेकॉर्डिंग करत होते..