टेंभुर्णी : सोलापूर जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, व सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक प्रहार जनशक्ती पक्ष स्वबळावर लढण्याचा निर्णय सोलापूर येथे झालेल्या बैठकीत झाला असून पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष दत्ता मस्के पाटील यांनी दिली.
गेल्या चार वर्षांपासून सोलापूर जिल्ह्यात प्रहार जनशक्ती पक्षाचे काम जिल्ह्यात महाराष्ट्र राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या आदेशाने आणि प्रदेशाध्यक्ष अनिल भाऊ गावंडे यांच्या सूचनेनुसार विविध प्रश्नांवर आंदोलने करुन न्याय मिळवून देत पक्षाचे काम जोमाने चालू आहे यामुळे पक्षामध्ये जिल्ह्यातील सर्व गावामधून कार्यकर्ते सामील होत आहेत. यामुळे पक्षाची ताकत वाढली असल्याने आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, व सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने स्वबळावर लढण्याची मागणी उपस्थित कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी केली आहे.यावेळी सभासद नोंदणी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा एफ आर पी चा प्रश्न आदि विषयावर चर्चा झाली. त्याचबरोबर तसेच अनेक नूतन पदाधिकार्यांच्या निवडी याठिकाणी संपन्न झाल्या जिल्ह्यातील अनेक तरूण या बैठकीच्या निमित्ताने प्रहारमध्ये सामील झाले.
या बैठकीस प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता मस्के पाटील शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी, जमीर भाई शेख, खालिद भाई मन्यार, रमेश पाटील, महेश शिंगाडे,वसीम देशमुख, रोहित साठे, संतोष पवार, रणजित जगताप, श्रीपाद पाटील,पंडित साळुंखे यांचेसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.