मुंबई : प्रसिद्ध गायिका संध्या मुखर्जी (Sandhya Mukherjee ) उर्फ संध्या मुखोपाध्याय (Sandhya Mukhopadhyay) यांनी पद्मश्री (padmashri award) पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे. या पुरस्काराठी दिल्लीहून एका वरिष्ठ अधिका-याचा त्यांना फोन आला होता.पण पद्मश्रीसाठी नामांकित होण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला आहे .
याबबत संध्या मुखर्जी यांची मुलगी सौमी सेनगुप्ता म्हणाल्या की, ‘वयाच्या ९० व्या वर्षी, जवळपास आठ दशकांची गायन कारकीर्द असताना, पद्मश्रीसाठी त्यांची निवड होणे हे लांच्छनास्पद आहे.’ पद्मश्री’ एखाद्या नवीन कलाकाराला देणं अधिक योग्य आहे ना? की ‘गीताश्री’ असलेल्या संध्या मुखोपाध्याय यांना? ‘ त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या गाण्यांच्या सर्व रसिकांनाही तेच वाटतं.
संध्या मुखर्जी यांनी एसडी बर्मन, अनिल बिस्वास, मदन मोहन, रोशन आणि सलील चौधरी यांच्यासह अनेक हिंदी चित्रपट संगीत दिग्दर्शकांसाठीही गाणी गायली आहेत. त्यांना ‘बंग बिभूषण’ सह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
२०१५ मध्ये सलिम खान यांनी देखिल पद्मश्री पुरस्कार नाकारला होता. त्यांच्या आधी, इतिहासकार रोमिला थापर यांनी 2005 मध्ये पद्मभूषण नाकारला होता.
वयाच्या 90 व्या वर्षी, सुमारे आठ दशकांहून अधिक काळ गाजवलेल्या गायन कारकीर्दीत, पद्मश्रीसाठी निवड होणे हे संध्या मुखर्जी यांच्या सारख्या महान गायिकेसाठी अपमानास्पद आहे,” अशीच प्रतिक्रिया सध्या त्यांचे चाहतेदेखील व्यक्त करत आहेत.