आरोग्यम् धनसंपदा असं म्हटलं जातं. दिर्घायुषी किंवा आपलं आरोग्य तंदुरुस्त राहण्यासाठी फक्त फिटनेसच नाही तर योग्य आहार देखील महत्वाचा आहे. उत्तम व्यायाम, मेडीटेशन त्याचबरोबर योग्य आहार देखील तितकाच महत्वाचा आहे. तंदुरुस्त आरोग्यासाठी आठवड्याला आहारात या भाज्यांचा समावेश असणं गरजेचं आहे.
अनेकजण प्रोटीनसाठी मासांहाराचं सेवन करतात मात्र अतिरिक्त मासांहार सेवन केल्याने आरोग्यावर याचा गंभीर परिणाम देखील होतो म्हणूनच प्रोटीन आणि व्हिटामीन वाढवण्य़ासाठी भाज्यांचा देखील आहारात समावेश असावा असं आहारतज्ज्ञ सांगतात.
बीट म्हणजेच बीटरूट हा एक पौष्टिक आणि आरोग्यास उपयुक्त आहे. रक्ताचे आजार किंवा रक्ताती कमरता असलेल्या अनेकांना बीट हे वरदान आहे. यामध्ये लोह, पोटॅशियम, फोलिक अॅसिड, फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि विविध जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात.
रक्तशुद्धी आणि हिमोग्लोबिन वाढवतो
बीटामध्ये लोह आणि फोलेट भरपूर प्रमाणात असते, जे रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते. त्यामुळे अॅनिमिया (रक्तातील रक्तपेशींचा अभाव) असलेल्या व्यक्तींना बीट खाणे खूप फायदेशीर ठरते. सलाड किंवा ज्यूस
किमान आठवड्यातून दोन ते तीनवेळा तरी सेवन करावं.
हिरव्या वाटाण्यात फायबरचा स्त्रोत अधिक असतो. त्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस, अपचन यांसारख्या पचनाच्या तक्रारी दूर होतात. आतड्यांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. हिरव्या वाटाण्यात अँटीऑक्सिडंट्स आणि नैसर्गिक पादार्थ (Plant Sterols) असतात ज्यामुळे हृदयविकाराचा दूर होतो. कोलेस्ट्रॉल कमी ठेवण्यासाठी देखील हिरवे उपयुक्त आहे.व्हिटॅमिन C, E आणि अँटीऑक्सिडंट्स यामुळे शरीराची इम्युनिटी मजबूत होते. सर्दी, खोकला, संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण मिळते. आठवड्यातून एकदा तरी हिरव्या वाटण्य़ाचं सूप किंवा भाजीचा समावेश जेवणात असायला पाहिजे.
कमी कॅलरीयुक्त पण पोषक तत्त्वांनी भरलेला घटक म्हणजे मशरूम. मशरूममध्ये बीटा-ग्लुकान्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. त्यामुळे संसर्गजन्य आजारांपासून शरीराचं संरक्षण होतं. पावसाळ्यात मशरुमचं सेवन अधिक आरोग्यदायी ठरतं. अतिरिक्त थंडीमुळे संधीवातासारखे त्रास जाणवत असतील तर मशरुमचं सेवन करावं. यामुळे हाडं मजबूत ठेवण्यास, कॅल्शियम शरीराला मिळण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी देखील मशरुम फायदेशीर ठरते. मशरुममध्ये व्हिटॅमिन B, अँटीऑक्सिडंट्स अधिक असतात यामुळे त्वचा चमकदार राहते आणि केस गळती कमी होते. मशरूममधील B-विटॅमिन्स मेंदूच्या पेशींना ऊर्जा देतात, स्मरणशक्ती सुधारतात आणि न्यूरोलॉजिकल आजारांपासून संरक्षण करतात.