मुंबई : पेट्रोल – डिझेलची सतत होणारी दरवाढ, सर्वसामान्याचं दिवसेंदिवस मोडलं जाणारं कबंरड, शतकपार होणारी इंधनांची दरवाढ याच्याविरोधात केंद्र सरकारच्या आणि मोदी सरकारच्या निषेधार्थ या अंसेवदनशील केंद्र सरकारला जागं करण्यासाठी आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे पेट्रोलपंपावरती जाऊन अनोखं आंदोलन करण्यात आले. तसेच मुंबईत ठिक-ठिकणी पट्रोल पंपावर “बघतोय काय रागानं…पट्रोलनंतर डिझेलचं सुद्धा शतक पार करुन दाखवलंय वाघानं!” असे उपाहासात्मक बॅनर लावण्यात आले आहेत, या पोस्टरव मोदींच्या फोटो लावण्यात आला असून, सध्या हे बॅनर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
एकिकडे कोरोनाच्या संकटातून आपण हळूहळू सावरत असताना, जनतेचा जीव मेटाकुटीला आला असताना, दुसरीकडे महागाईचा भस्मासूर दिवसागणिक वाढत आहे. महागाईमुळं जनता त्रस्त असल्यामुळं सरकारच्या धोरणावर आणि सरकारच्या कार्यपद्धतीवर पिचलेली जनतेच्या मनात कमालीचा रोष आहे. आता तर पट्रोल आणि डिझेल यांनी महागाईचा उच्चांक गाठला आहे. फक्त ऑक्टोबर महिन्यातील २० दिवसात पेट्रोल ४.५५ रुपये तर, डिझेल ५.०५ रुपयांनी महागले असल्यामुळं जगायचं की मरायचं? असा संतप्त सवाल जनता उपस्थित करत आहे. त्यामुळं आज राष्ट्रवाद युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध करत पेट्रल पंपावर अनोखं आंदोलन करण्यात आले.
मुंबईत सलग दहाव्या दिवशी पेट्रोलच्या किंमतीत वाढ
मुंबईत सलग दहाव्या दिवशी पेट्रोलच्या किंमतीत दरवाढ पाहायला मिळत आहे. आज मुंबईत पेट्रोलची किंमत ११२ रूपये ११ पैसे झाली. डिझेलचा दर प्रति लिटर १०२.८९ पैसे आहे. आता पेट्रोल ३४ पैशांनी महाग झाले आहे. तर डिझेल ३७ पैशांनी महागले आहे. पावर पेट्रोल ११६.०२ पैसे आहे. पेट्रोल १३० रुपये प्रती लिटरपर्यंत जाऊ शकते असं बोलले जात आहे. महामारीच्या काळात सतत दरवाढ होत असल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित मात्र बिघडत चालले आहे. त्यामुळं त्याची झळ खिशाल्या बसत आहे. सामान्य जनता आधीच पिचली असताना, दिवसागणिक वाढणाऱ्या महागाईला कंटाळली असून, या महागाईच्या काळात जगायचे कसे? असा संतप्त सवाल जनतेला पडला आहे.
मागील २० दिवसांत १५ वेळा पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्या
मागील २० दिवसांत १५ वेळा पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्याया महिन्यातील फक्त २० दिवसात पेट्रोल आणि डिझेल १५ वेळा महाग झाले आहे. २०२१ सालच्या सुरुवातीपासून राजधानी दिल्लीत १ जानेवारी रोजी पेट्रोल ८३.९७ रुपये आणि डिझेल ७४.१२ रुपये प्रति लीटर होते. आता ते १०६.१९ रुपये आणि ९४.९२ रुपये प्रति लीटर आहे. म्हणजेच, १० महिन्यांपेक्षा कमी कालावधीत पेट्रोल २२.२२ रुपयांनी आणि डिझेल २०.८० रुपयांनी महाग झाले आहे. या महागाईला जनता कंटाळली असून स्वत:ची गाडी वापरण्यापेक्षा सार्वजनिक वाहनाला जनता पसंती देत असल्याचे पाहयला मिळत आहे.
३२ राज्यात पेट्रोल व १६ राज्यात डिझेल १००च्या पुढे
३२ राज्यात पेट्रोल व १६ राज्यात डिझेल १०० च्या पुढे देशातील २९ राज्यांमध्ये पेट्रोल १०० रुपये प्रति लीटर पार केले आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दमण आणि दीव, छत्तीसगड, दिल्ली, जम्मू आणि काश्मीर, आंध्र प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, मणिपूर, नागालँड, पुद्दुचेरी, तेलंगणा, पंजाब, सिक्कीम, ओडिशा, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, त्रिपुरा , मिझोराम, झारखंड, गोवा, आसाम, गुजरात, हरियाणा, हिमाचल, उत्तराखंड, मेघालय, दादरा आणि नगर हवेली आणि राजस्थानमध्ये पेट्रोल १०० रुपयांच्यावर आहे. तर डिझेल मध्य प्रदेश, छत्तीसगढ़, आंध्र प्रदेश, उड़ीसा, तेलंगाना, बिहार, गुजरात, महाराष्ट्र, जम्मू-कश्मीर, झारखंड, केरल, कर्नाटक, गोआ, दादरा और नगर हवेली, तमिलनाडु और राजस्थान या राज्यात डिझेलने शतक पार केले आहे.