अभिनेत्री श्रेया बुगडेला आजवर अनेक गिफ्टस मिळाले मात्र अलिकडेच तिला खिलाडी कुमार अक्षय कुमारकडून खास गिफ्ट मिळाल्यामुळे श्रेयाने लागलीच त्याचा व्हिडिओ तिच्या सोशलमीडियावर शेअर केला आहे.
अक्षय कुमारने अलिकडेच चला हवा येऊ द्या या लोकप्रिय कार्यक्रमामध्ये हजेरी लावली अक्षयचा बच्चन पांडे सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे या शोच्या प्रमोशनसाठी तो इथे आला होता. यावेळी अक्षयने सगळ्या कलावंतांसह हा शो एन्जॉय केला आणि खास जाता जाता त्याने श्रेयाला एक स्मार्टफोन गिफ्ट म्हणून दिला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये अक्षय कुमार तिला हे गिफ्ट का दिलं याचं कारण सांगितलं आहे.अक्षय म्हणाला, ‘श्रेया मागच्या ८ वर्षांपासून ‘चला हवा येऊ द्या’ हा शो करत आहे आणि अलिकडे ती ‘किचन कल्लाकार’साठी सुत्रसंचालन करत आहे. पण तिच्या सोशल मीडियावर मात्र त्या शोमधील फोटो जास्त असल्याचं दिसतंय. त्यामुळेच तिला मी हा फोन गिफ्ट देतोय जेणेकरून तिने इथले फोटो देखील पोस्ट करावे.’ श्रेयाचा हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला असून त्यावर अनेक युजर्सनी कमेंट केल्या आहेत.
यावेळी अक्षयने क्रितीसह एक डान्स परफॉर्मही केला.