फोटो सौजन्य: Freepik
हल्ली हार्ट अटॅकचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे आता तरुणांमध्ये सुद्धा हार्ट अटॅकचे प्रमाण झपाट्याने वाढताना दिसत आहे. परंतु खूप लोकांचा असा गैरसमज आहे की हार्ट अटॅकची लक्षणं ही केवळ हृदयापर्यंतच मर्यादित आहे. परंतु कधीकधी हृदयाच्या समस्यांची लक्षणे पायांमध्येही दिसू लागतात. पाय आणि हृदय यांमधील अंतर जास्त असल्याने, बहुतेक लोक पायातील बदलांकडे जास्त लक्ष देत नाही.
प्रत्यक्षात पायांमध्ये होत असलेले बदल जर तुमच्या वेळीच लक्षात आले तर हृदयविकार अगदी सुरुवातीच्या टप्प्यात थांबविता येऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही लक्षणांबद्दल सांगणार आहोत, जी दिसताच तुम्ही ताबडतोब डॉक्टरांकडे जावे.
पाय सतत दुखणे, विशेषत: रात्री, किंवा चालताना त्रास होणे हे हृदयविकाराचे लक्षण असू शकते. पायांमधील रक्त संचार कमी झाल्यामुळे असे होते.
जर पायांचा रंग पिवळा किंवा निळा झाला तर ते देखील हृदयविकाराचे लक्षण असू शकते. हे देखील रक्त संचाराच्या समस्यांमुळे होते.
पायांवरील केसं कमी होणे किंवा ती झडणे याचे संकेत असू शकते की शरीरातील सर्व भागात पुरेसे रक्त पोहचत नाही आहेत. हृदयाची गती कमी झाल्यामुळे सुद्धा असे होऊ शकते.
जर पायाची नखं हळूहळू वाढत असतील किंवा त्यांचा रंग बदलत असेल, तर हे ब्लड सर्कुलेशन समस्यांचे लक्षण असू शकतं, जे हृदय नीट काम करत नसल्याचं सूचित करते.
वरील लक्षणे ही इतर आरोग्य समस्यांमुळे देखील होऊ शकतात. जर तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणे दिसली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. याशिवाय हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा, नियमित व्यायाम करा, संतुलित आहार घ्या आणि धूम्रपान टाळा.