आपल्या पाळीव प्राण्यावर (Pet) आपलं खूप प्रेम असतं. ते थोडावेळ जरी घरात दिसले नाही तर जीव कासावीस होतो. हे मुके जीव कुठे अडकले किंवा काही अपघात झाला तर त्यांना बाहेर काढण्यासाठी काही जण आपल्या जीवाचीही पर्वा करत नाही. मात्र, आपल्या पाळीव मांजरीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका महिलेला जीव गमवावा लागल्याची घटना उघडकीस आली आहे. आपल्या पाळीव मांजरीला वाचवण्याच्या प्रयत्नात कोलकाता येथील एका महिलेचा आठव्या मजल्यावरून पडून मृत्यू (Women Died While Rescuing Cat) झाला.
[read_also content=”कॅालेजच्या फॅशन शोमध्ये बुरखा घालून विद्यार्थिनींचा रॅम्प वॉक, व्हिडिओ व्हायरल होताच गोंधळ, जमियत उलेमाने घेतला आक्षेप! https://www.navarashtra.com/india/rampwalk-in-burqa-in-collage-fashoon-show-in-muzzaffarnagar-video-goes-viral-nrps-484219.html”]
कोलकाता टोलीगंज परिसरातील एका सोसायटमीध्ये ही घटना घडली. इमारतीच्या आठव्या मजल्यावर राहणाऱ्या महिलेची मांजर छतामध्ये मांजर अडकले होती आणि महिला तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होती. यावेळी ती 8 व्या मजल्यावरून खाली पडली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. महिनाभरापूर्वीच हे कुटुंब भाड्याने या फ्लॅटमध्ये राहायला आले होते. अंजना दास असं मृत महिलेचं नाव आहे. तिचा रक्ताने माखलेला मृतदेह दोन इमारतींमध्ये पडलेला आढळून आला.
ही घटना सकाळी आठच्या सुमारास घडली. लेव्ह अॅव्हेन्यू रोडवर असलेल्या सोसायटीतील गार्ड आणि इतर लोकांना काहीतरी पडल्याचा आवाज आला. लोकांनी याकडे धाव घेतली तेव्हा अंजना दास जमिनीवर पडलेल्या दिसल्या. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अंजना वाचवण्याच्या प्रयत्नात खाली पडलेल्या मांजराला इमारतीत उपस्थित असलेल्या लोकांनी सुखरूप बाहेर काढले. आजूबाजूच्या लोकांनी सांगितले की, अंजना रविवारी संध्याकाळपासून तिच्या मांजरीचा शोध घेत होती. त्यानंतर सोमवारी मांजर ताडपत्रीत अडकल्याचे त्यांच्या लक्षात आले.यावर तिने ते बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला आणि यादरम्यान ती खाली पडली.
शेजाऱ्याने सांगितले की, अंजना ही विवाहीत असून तिच्या वृद्ध आईसोबत येथे राहत होती. महिनाभरासाठी ती इथे भाड्याने राहयला आली होती. या कुटुंबाचे वडिलोपार्जित घर सैराट बोस रोडवर आहे. त्या घराचीपुनर्बांधणी सुरू आहे. त्यामुळे ते येथे राहायला आले होते. येथे ते 11 महिने राहणार होते. हे प्रकरण पूर्णपणे अपघाती असल्याचे दिसत असून त्यात अन्य कोणताही कट किंवा हेतुपुरस्सर खून असल्याचे दिसत नाही, असेही पोलिसांनी सांगितले.