महागडा फोन आता तुमच्या बजेटमध्ये! 33,999 रुपयांत लाँच झालेला Samsung स्मार्टफोन केवळ इतक्या रुपयांत खरेदी करा, वाचा फीचर्स
मिड रेंज किंमतीत लाँच झालेला हा स्मार्टफोन आता बजेट किंमतीत उपलब्ध झाला आहे. त्यामुळे ग्राहकांना दमदार फीचर्स आणि परफॉर्मंसची मजा आता परवडणाऱ्या किंमतीत घेता येणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी A35 5G च्या ऑसम नेव्ही 128 GB व्हेरिअंटवर उपलब्ध असलेली डील आणि या स्मार्टफोनचे फीचर्स जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X)
सॅमसंगने त्यांच्या A सीरीजमधील हा स्मार्टफोन 2024 मध्ये 33,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केला होता. मात्र आता ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनच्या खरेदीवर तब्बल 15 हजार रुपयांचे डिस्काऊंट मिळणार आहे. ऑफर्स आणि डिस्काऊंटनंतर सॅमसंग गॅलेक्सी A35 5G च्या ऑसम नेव्ही 128 GB व्हेरिअंट 19,999 रुपयांत उपलब्ध आहे. बँक ऑफर्ससह या स्मार्टफोनची किंमत आणखी कमी झाली आहे.
सॅमसंग गॅलेक्सी A35 5G च्या ऑसम नेव्ही 128 GB व्हेरिअंटवर फ्लिपकार्ट एसबीआई आणि एक्सिस बँक क्रेडिट कार्डवर 1000 रुपयांचे एक्स्ट्रा डिस्काऊंट देखील देत आहे. या ऑफर्स आणि डिस्काऊंटनंतर फोनची किंमत 18,999 रुपये होणार आहे. याव्यतिरिक्त, तुम्ही हा फोन 3,334 रुपयांपासून सुरू होणाऱ्या नो-कॉस्ट ईएमआय पर्यायांसह देखील खरेदी करू शकता. एकूणच, या ऑफर्समुळे हा एक प्रभावी डील बनतो. म्हणजेच तुम्हाला दमदार फीचर्स आणि आकर्षक डिझाईन असलेला स्मार्टफोन अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
सॅमसंग गॅलेक्सी A35 5G एक दमदार मिड-रेंज 5G फोन आहे, ज्यामध्ये 6.6-इंच 120Hz सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. एवढंच नाही तर सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये OIS सह 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि एक स्ट्रांग ग्लास-बॅक डिझाईन देण्यात आले आहे. फोनमध्ये पावरफुल एक्सीनोस1380 प्रोसेसर, 5,000mAh बॅटरी, IP67 वॉटर/डस्ट रेजिस्टेंस देण्यात आले आहे. यासोबतच डिव्हाईसला 4 OS अपग्रेड आणि 5 वर्षांच्या सिक्योरिटी अपडेटसह दिर्घकाळ चालणारा सपोर्ट देखील मिळणार आहे. या सर्व खास फीचर्समुळे हा स्मार्टफोन अतिशय खास बनणार आहे.






