नवी दिल्ली / इस्लामाबाद : लैंगिक हिंसाचारावरून (Sexual Violence) पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी केलेल्या वक्तव्याला बांगलादेशच्या (Bangladesh) बंडखोर लेखिका तस्लिमा नसरीन (Taslima Nasrin) यांनी त्याच शब्दांत प्रत्युत्तर दिले. त्यासाठी इम्रान यांचे शर्ट घातला नसतानाचे तरुणपणातील छायाचित्रही त्यांनी ट्विटरवर (Twitter) पोस्ट केले.
स्त्रीने फारच कमी कपडे घातल्यास त्याचा परिमाण पुरुषांवर होईलच. ते रोबो नसले तरच अपवाद असेल. हा कॉमन सेन्स आहे, असे इम्रान म्हणाले होते. एचबीओ ॲक्सीऑस वाहिनीच्या जोनाथन स्वान यांना दिलेल्या मुलाखतीत महिलांविरुद्धच्या लैंगिक हिंसाचार रोखण्याबाबत त्यांनी हे मत व्यक्त केले. ते म्हणाले की, आमच्या देशात अश्लीलतेमुळे खास करून लहान मुला-मुलींचे लैंगिक शोषण होत आहे. हे टाळण्याचा एक मार्ग म्हणजे समाजात मोह पडण्याची कारणे टाळायला हवीत.
If a man is wearing very few clothes, it will have an impact on women, unless they are robots. pic.twitter.com/2Bdix7xSv7
— taslima nasreen (@taslimanasreen) June 22, 2021
इम्रान यांनी एप्रिल महिन्यात संसदेतील प्रश्नोत्तराच्या सत्रात असेच मत व्यक्त केले होते. पर्दा पद्धतीचा उल्लेख करून ते म्हणाले होते की, पाकिस्तानमध्ये समाज आणि जीवनपद्धती पूर्णपणे वेगळी आहे. त्यामुळे तुम्ही मोहाला वाव मिळण्याचे प्रमाण एका पातळीच्या पुढे नेले तर या सर्व तरुण मुलांना काहीही करता येणार नाही. त्याचे परिणाम समाजात उमटणारच.
[read_also content=”है तय्यार हम : तिसऱ्या लाटेसाठी मुंबई महापालिकेने कसली कंबर; मुलांसाठी स्वतंत्र विभाग जुलैअखेरपर्यंत होणार तयार : अतिरिक्त आयुक्तांची माहिती https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/mumbai-municipal-corporation-is-ready-for-the-third-wave-of-coronavirus-separate-section-for-children-to-be-ready-by-end-of-july-additional-commissioner-nrvb-146575/”]
याविषयी आणखी भाष्य करावे, असे इम्रान यांना सांगण्यात आले. त्यावेळी ते म्हणाले की, तुम्ही ज्या प्रकारच्या समाजात राहता त्यावर ते बरेचसे अवलंबून आहे. जर तुमच्या समाजाने अशा गोष्टी पाहिल्या नसतील तर त्यांच्यावर परिणाम होणे अटळ असेल.
पाकिस्तान मुस्लीम लीग या विरोधी पक्षाच्यावर प्रवक्त्या मरीयम औरंगजेब यांनी सांगितले की, इम्रान यांच्यासारख्या अस्वस्थ, स्त्रीद्वेषी, अधःपात झालेल्या व्यक्तीचा दृष्टिकोन जगासमोर आला आहे. महिलांच्या कपड्यांबाबतच्या पसंतीमुळे लैंगिक हिंसाचार होत नाहीत, तर पुरुषच तसे तिरस्करणीय कृत्य करतात. अल्लाने आत्मनिग्रहासारख्या एका छोट्याशा गुणाला फार मोठे महत्त्व दिले आहे, हे मी इम्रान यांच्या माहितीसाठी नमूद करू इच्छिते.
[read_also content=”उंदरानं डोळा कुरतडलेल्या रुग्णाचा मृत्यू, मुंबईच्या राजावाडी रुग्णालयात अखेरचा श्वास; मृत्यूचं कारण अद्यापही गुलदस्त्यातच https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/shocking-mumbai-municipal-hospital-patient-dies-due-to-rat-gnaws-of-mans-eye-know-the-details-nrvb-146563/”]
अधिकृत आकडेवारीनुसार पाकिस्तानात दिवसाला बलात्काराच्या किमान ११ घटना घडतात. गेल्या सहा वर्षांत पोलिसांकडे तक्रार झालेल्या गुन्ह्यांची संख्या २२ हजारपेक्षा जास्त आहे.
women will be affected if men wear less clothes says taslima nasrin