टाळूवर वाढलेले फँगल इन्फेक्शन मुळांपासून होईल नष्ट! 'या' पद्धतीने लावा अश्वगंधाचा घरगुती लेप, केस होतील सुंदर
केसांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. केसांमध्ये कोंडा होणे, केस गळणे, केसांमध्ये उवा होणे किंवा टाळूवर वाढलेल्या फंगल इन्फेक्शनमुळे केस मुळांपासून खराब होऊन जाते. टाळूवर वाढलेल्या इन्फेक्शनकडे लक्ष न दिल्यास इन्फेक्शन केसांमध्ये पसरते आणि केसांच्या गुणवतेवर परिणाम दिसून येतो. त्यामुळे केसांसंबधित समस्या वाढल्यानंतर वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. सर्वच महिलांना लांबलचक आणि मजबूत केस हवे असतात. पण वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे किंवा धूळ, मातीमुळे केस खूप जास्त कोरडे होतात. केस कोरडे किंवा निस्तेज झाल्यानंतर ते सुधारण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या हेअर ट्रीटमेंट करून घेतात, पण यामुळे फारसा परिणाम दिसून येत नाही.(फोटो सौजन्य – istock)
चमचाभर तांदुळाचा वापर करून घरीच तयार करा ‘मॅजिकल क्रीम’, सुरकुत्या- पिगमेंटशन कायमचे होईल गायब
केसगळती थांबवून, केसांची वाढ भराभर होण्यासाठी कायमच केमिकल युक्त हेअर सीरम किंवा शाम्पूचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. घरगुती उपाय केल्यामुळे केसांची गुणवत्ता सुधारते आणि केस लांबलचक होण्यास मदत होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोणत्या आयुर्वेदिक पदार्थाचा वापर केल्यामुळे केसांची गुणवत्ता सुधारते आणि टाळूवरील इन्फेक्शन कमी करण्यासाठी कोणते उपाय करावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. आयुर्वेदामध्ये केसांच्या वाढीसाठी आणि केसांच्या सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी अश्वगंधा वापरण्याचा सल्ला दिला जातो. अश्वगंधाला ‘वनस्पतींचा राजा’ मानले जाते. केसांचे सौंदर्य कायम टिकवून ठेवण्यासाठी अश्वगंधाचा वापर केला जातो. यामुळे केसांची मूळ मजबूत होतात.
अश्वगंधाचा लेप बनवण्यासाठी अश्वगंधा, दही, मध इतकेच साहित्य लागेल. लेप तयार करण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये अश्वगंधा पावडर घेऊन त्यात दही मिक्स करावे. त्यानंतर थोडस मध टाकून मिक्स करून घ्या. तयार केलेला लेप व्यवस्थित ,मिक्स केल्यानंतर केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकापर्यंत सगळीकडे लावा. त्यानंतर ३० ते ४० मिनिटं ठेवून नंतर हातांना पाणी लावून हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्या. हा लेप आठवड्यातून एकदा केसांच्या मुळांवर नियमित लावल्यास केसांच्या बऱ्याच समस्या दूर होतील.
अश्वगंधा शरीरातील ‘कोर्टिसोल’ पातळी कमी करून तणाव नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते. आयुर्वेदात सुद्धा केसांच्या निरोगी वाढीसाठी आणि केस चमकदार राहण्यासाठी अश्वगंधा वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हा लेप लावल्यानंतर टाळूवर हलक्या हाताने मसाज करावे. मसाज केल्यामुळे केसांमधील रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते. केसांच्या मुळांना पुरेसे पोषण देण्यासाठी आयुर्वेदिक पदार्थांचा वापर केला जातो. केसांमध्ये वाढलेला कोरडेपणा कमी करण्यासाठी दह्याचा वापर करावा. दही आणि अश्वगंधाचा एकत्र लेप केसांवर लावल्यास स्काल्पवरील खाज कमी आणि इन्फेक्शन वाढत नाही.






