Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुलांना बनवा सुसंस्कृत आणि प्रामाणिक; लहानपणापासून लावा या ५ महत्त्वाच्या सवयी

Parenting Tips : प्रत्येक पालकाला आपली मुले सुसंस्कृत, प्रामाणिक आणि यशस्वी व्हावीत असे वाटते. मात्र हे गुण आपोआप विकसित होत नाहीत. लहानपणापासूनच योग्य सवयी लावल्यास मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास घडतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 18, 2026 | 12:00 PM
मुलांना बनवा सुसंस्कृत आणि प्रामाणिक; लहानपणापासून लावा या ५ महत्त्वाच्या सवयी

मुलांना बनवा सुसंस्कृत आणि प्रामाणिक; लहानपणापासून लावा या ५ महत्त्वाच्या सवयी

Follow Us
Follow Us:
  • मुलांना लहानपणापासूनच चांगल्या सवयी लावणे फार गरजेचे असते.
  • मोठे झाल्यावर मुलं पालकांचं फार ऐकत नाही त्यामुळे लहानपणच एक वय आहे जेव्हा तुम्ही त्यांना चांगल्या गोष्टी शिकवू शकता.
  • मुलांना सुसंस्कृत आणि प्रामाणिक बनवायचं असेल तर काही गोष्टी वेळीच शिकवणे गरजेचे असते.
पालकांना आपली मुले सुसंस्कृत्त, बुद्धिमान, प्रामाणिक आणि यशस्वी व्हावीत अशी इच्छा असते. मात्र लहानपणापासूनच मुलांना काही सवयी लावणे त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी महत्त्वाचे असते. या सवयी मुलांना मानसिकदृष्ट्‌याही मजबूत बनवतात. मुले ५ वर्षांची झाली की त्यांच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा सुरू होतो. या क्यात गोष्टी समजून घेण्याची आणि लक्षात ठेवण्याची त्यांची क्षमता विकसित होते. त्यामुळे त्यांना स्वावलंबी आणि शिस्तप्रिय बनवण्यासाठी काही चांगल्या सवयी लावणे अत्यंत आवश्यक आहे.

महागड्या क्रीमची गरज नाही फक्त हे एक काम करा आणि 5 रुपयांत पिंपल्सना करा रामराम

खरं बोलण्याची सवय लावा मुलांना खरं

बोलण्याची सवय लावा. मुलांना हे समजावून सांगा की चूक झाल्यावर ती लपवणे योग्य नाही. यामुळे प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास दोन्ही विकसित होण्यास मदत होते.

आदर करायला शिकवा

लहानपणापासूनच आपल्या मुलांना मोठ्यांचा अनादर नाही तर आदर करायला शिकवा. मोठ्यांविषयी प्रेम आणि आदर वाटणे खूप गरजेचे असते. यामुळे मुलांमध्ये सहानुभूती, चांगले वर्तन आणि संवाद कौशल्ये वाढतात. आदरयुक्त वातावरणामुळे मुले स्वतःला सुरक्षित समजतात, यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्यात सहकार्याची भावना निर्माण होते. यामुळे जबाबदार नागरिक बनण्यासही मदत होते.

वेळेची किंमत समजावून सांगा

वेळेपेक्षा मौल्यवान काहीही नाही हे मुलांना सांगणे गरजेचे आहे. मुलांना प्रत्येक कामासाठी वेळ निश्चित करण्यास प्रोत्साहित करा. यामुळे त्यांना वेळेचे मूल्य समजेल आणि त्यांच्या दिनचर्येत शिस्त टिकून राहील.

सामाजिक कौशल्ये शिकवा

मुलांना प्लिज, थैंक यु, आणि सॉरी म्हणायला शिकवा. याशिवाय आपल्या गोष्टी इतरांसोबत वाटून घेणे देखील शिकवा. मुलांमधील निरागसपणा टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्या मनामध्ये परोपकाराची भावना निर्माण होणे गरजेचे आहे.

आठवड्याभरात चेहऱ्यावरील पिंपल्स होतील कायमचे गायब! घरच्या घरी ५ रुपयांच्या ‘या’ पदार्थांचा वापर केल्यास त्वचा होईल स्वच्छ

मैदानी खेळ

आजकालच्या मुलांना सतत मोबाईल वापरण्याची सवय असते. मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांचे मानसिक आरोग्य बिघडते आणि मुलांमधील चिडचचिडेपणा वाढतो. यामुळे मुलांना लहानपणापासूनच मैदानी खेळांची सवय लावा, असं केल्याने त्यांचे आरोग्य निरोगी राहते आणि ते तंदुरुस्त राहतात. खेळून झाल्यावर खेळणी आणि वाचून झाल्यावर पुस्तके त्यांच्या जागेवर ठेवण्याची सवय लावा. यामुळे मुलांना जबाबदारीची जाणीव होईल.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: 5 important habits to make children honest and well mannered lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 12:00 PM

Topics:  

  • child
  • lifestyle news
  • parenting tips

संबंधित बातम्या

Iodine Deficiency: आयोडीनच्या कमतरतेवर मात करायचीय? आहारात समाविष्ट करा ‘या’ ४ गोष्टी; थायरॉईडची समस्या राहील दूर
1

Iodine Deficiency: आयोडीनच्या कमतरतेवर मात करायचीय? आहारात समाविष्ट करा ‘या’ ४ गोष्टी; थायरॉईडची समस्या राहील दूर

घरच्या घरी बनवा कम्पोस्ट खत! माशा आणि दुर्गंधीशिवाय स्वयंपाकघर अन् बागेच्या कचऱ्यापासून तयार करा सेंद्रिय खत
2

घरच्या घरी बनवा कम्पोस्ट खत! माशा आणि दुर्गंधीशिवाय स्वयंपाकघर अन् बागेच्या कचऱ्यापासून तयार करा सेंद्रिय खत

Hair Care: शॅम्पू करूनही स्कॅल्प तेलकट? मग केस धुताना ‘या’ चुका आजच टाळा; जाणून घ्या योग्य पद्धत
3

Hair Care: शॅम्पू करूनही स्कॅल्प तेलकट? मग केस धुताना ‘या’ चुका आजच टाळा; जाणून घ्या योग्य पद्धत

Fridge Water Leakage: फ्रीजमधून सतत पाणी गळतंय? मेकॅनिकला बोलावण्यापूर्वी ‘हे’ सोपे उपाय करा
4

Fridge Water Leakage: फ्रीजमधून सतत पाणी गळतंय? मेकॅनिकला बोलावण्यापूर्वी ‘हे’ सोपे उपाय करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.