मोड आलेल्या मुगाचे आरोग्यासाठी फायदे
दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी, जेव्हा तुम्ही रात्री झोपता तेव्हा पचनसंस्थादेखील आपले काम पूर्ण करते आणि त्याच वेळी आपल्या शरीरातील अनेक पेशी तयार होतात आणि खराब होतात, त्यामुळे डॉक्टरही रिकाम्या पोटी काही पदार्थ खाण्याचा सल्ला देतात. यासाठीच सकाळचा नाश्ता हा अधिक महत्त्वाचा ठरतो.
सकाळचा नाश्ता उत्तम आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, असे मानले जाते. नाश्त्यासाठी अंकुरलेला अर्थात मोड आलेला मूग खूप फायदेशीर मानला जातो. यामध्ये फायबर, अमिनो ॲसिड, अँटिऑक्सिडंट्सचे खूप चांगले स्त्रोत आहेत, जे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे ठरतात. इतकेच नाही तर त्यात प्रोटीओलाइटिक एन्झाईम्सदेखील आढळतात. चला जाणून घेऊया नाश्त्यामध्ये अंकुरित मूग खाण्याचे काय फायदे आहेत. (फोटो सौजन्य – iStock)
मोड आलेले मूग फायदे
मोड आलेल्या मुगाचे आरोग्यदायी फायदे
जर तुमच्याकडे जिममध्ये जाण्यासाठी किंवा व्यायाम करण्यासाठी वेळ नसेल तर काळजी करू नका. तुम्ही सकाळी उठून अंकुरलेले मूग खाण्यास सुरुवात करा. हा एक पौष्टिक आणि आरोग्यदायी अन्नपदार्थ आहे. याचे सेवन केल्याने तुमचे शरीर तर तंदुरुस्त राहतेच शिवाय तुम्हाला अनेक आजारांपासून आराम मिळतो.
हृदयासाठी उत्तम
हृदयासाठी फायदेशीर
मोड आलेल्या मुगात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते, जे हृदयाला तंदुरुस्त ठेवण्यास खूप मदत करते. दररोज सकाळी याचे सेवन केल्याने शरीरातील रक्ताभिसरण तर सुधारतेच पण हृदयाच्या स्नायूंना बळकट करून पंपिंग करणे अधिक सोपे होते.
वजन नियंत्रणासाठी भक्कम
अंकुरीत मूग खाल्ल्याने वजनावर येईल नियंत्रण
अंकुरित मुगामध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते, त्यामुळे ते खाल्ल्याबरोबर पचते. मोड आलेले मूग खाल्ल्याने पोटाची चरबी वाढत नाही आणि उंचीनुसार वजन संतुलित राहते. यामुळेच पैलवानांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत नाश्त्यामध्ये मूग खाणं हे फायदेशीर ठरतं.
हेदेखील वाचा – 5 सुपरफूड्स हृदय आणि मेंदू ठेवतील हेल्दी, मिळतील कमालीचे फायदे
प्रोटीनचा चांगला स्रोत
मुगातून मिळतात उत्तम प्रोटीन
ज्या तरुणांना मजबूत शरीर बनवायचे आहे त्यांच्यासाठी अंकुरित मूग रामबाण उपाय आहे. वास्तविक, अंकुरलेल्या मुगामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. हे स्नायू तयार करण्यास आणि दुरुस्त करण्यास मदत करते. याच्या सेवनाने शरीर मजबूत आणि शक्तिशाली बनते. अँटिऑक्सिडंट्स, क्लोरोफिल आणि व्हिटॅमिन सीने भरपूर अंकुरलेले मूग खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. हे शरीर डिटॉक्स करण्यास मदत करते.
घनदाट लांबसडक केसांसाठी
केसांच्या वाढीसाठी वरदान
केस गळणे किंवा पांढरे होण्याच्या समस्येने त्रस्त असलेले लोक मोड आलेल्या मुगाच्या सेवनाने त्यांच्या समस्येवर मात करू शकतात. यामध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मुबलक प्रमाणात आढळतात, ज्यामुळे डोक्यावरील केसांची मुळे मजबूत राहतात. तसेच केस लवकर सफेद न होण्यासाठीही याचा फायदा मिळतो.
हेदेखील वाचा – तुमचे देखील केस पातळ झालेत? तर ‘हे’ घरगुती उपाय करून पाहा, काही दिवसांमध्ये दिसेल फरक
डायबिटीस नियंत्रणासाठी
डायबिटीसवर येते उत्तम नियंत्रण
हाय डायबिटीस म्हणजेच मधुमेह असलेल्या लोकांसाठी मोड आलेले मूग खाणे चांगले मानले जाते. यामध्ये प्रथिने आणि फायबरचे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे इन्सुलिनचे उत्पादन वाढण्यास मदत होते. त्यामुळे आपोआप डायबिटीस नियंत्रणात येतो. यामुळे नियमित नाश्त्याला याचा वापर करावा.
पोटाचे त्रास कमी
पोटाचे त्रास कमी होण्यास मदत
ज्यांना पोटदुखीचा त्रास होत असेल त्यांनी ताबडतोब मोड आलेल्या मुगाचे सेवन सुरू करावे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, यामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते, जे शरीरातील पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. यामुळे बद्धकोष्ठता आणि अतिसारापासूनही आराम मिळतो.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.