Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 7 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राम मंदिर आणि काशी विश्वनाथांचे दर्शन करायचंय? IRCTC देत आहे 9 दिवसांत 8 धार्मिक स्थळ फिरण्याची संधी

IRCTC Tour Package : तुम्हीही धार्मिक पर्यटनाचा विचार केला असेल तर हे टूर पॅकेज तुमच्या कामाचे ठरणार आहे. IRCTC ने भारत गौरव स्पेशल टूरिस्ट ट्रेनच्या मदतीने एक खास टूर पॅकेज लाँच केले आहे. यात तुम्हाला चार प्रमुख आणि सुप्रसिद्ध धार्मिक स्थळांची भेट करुन दिली जाईल. मुख्य म्हणजे यात सर्व सोयीसुविधांचाही समावेश असेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 18, 2026 | 08:19 AM
राम मंदिर आणि काशी विश्वनाथांचे दर्शन करायचंय? IRCTC देत आहे 9 दिवसांत 8 धार्मिक स्थळ फिरण्याची संधी

राम मंदिर आणि काशी विश्वनाथांचे दर्शन करायचंय? IRCTC देत आहे 9 दिवसांत 8 धार्मिक स्थळ फिरण्याची संधी

Follow Us
Follow Us:
  • ९ दिवसांच्या धार्मिक यात्रेत भाविकांना अनेक पवित्र स्थळांचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे.
  • प्रवाशांच्या बजेटनुसार विविध श्रेणींमध्ये पॅकेज उपलब्ध असून विशेष सवलतीचाही लाभ मिळेल.
  • प्रवास, निवास, भोजन आणि विमा यांसारख्या सुविधा एका पॅकेजमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
काशीतील गंगा आरती आणि अयोध्येतील श्रीराम मंदिर हे देशातील सर्वात लोकप्रिय धार्मिक स्थळांच्या यादीत येतात. दरवर्षी हजारो पर्यटक यासाठी उत्तर प्रदेशला भेट देत असतात. हे भारतातील सर्वात लोकसंख्या असलेले राज्य असून ते आपल्या समृद्ध धार्मिक आणि सांस्कृतिक वारशासाठी जगभर प्रसिद्ध आहे. तुम्हीही धार्मिक पर्यटनाचा विचार करत असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. IRCTC भाविकांसाठी एक खास टूर पॅकेज घेऊन आले आहे. ही टूर ‘भारत गौरव स्पेशल टूरिस्ट ट्रेन’ च्या मदतीने पार पडेल. ९ दिवसांच्या या खास काशी तीर्थ यात्रेत तुम्हाला अनेक सुविधा पुरवल्या जातील आणि यासहच उत्तर प्रदेशच्या काही खास धार्मिक स्थळांची भेट घडवून आणली जाईल. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Travel News : सुंदरतेसाठी प्रसिद्ध आहेत महाराष्ट्रातील हे 5 शहर, बजेट ट्रिपसाठी परफेक्ट पर्याय

यात्रेशी जोडलेल्या काही खास गोष्टी

हा संपूर्ण टूर पॅकेज ८ रात्री आणि ९ दिवसांचा असणार आहे. या धार्मिक यात्रेची सुरुवात ९ सप्टेंबर २०२६ रोजी होईल. या यात्रेचा मुख्य उद्देश प्रवाशांना देशातील सर्वात प्रमुख आणि पवित्र धार्मिक स्थळांना एकदाच भेट देण्याची संधी देणे हा आहे.

कोणकोणत्या पवित्र ठिकाणांचे दर्शन होईल?

या यात्रेत तुम्हाला उत्तर प्रदेशच्या चार प्रमुख शहरांतील प्रसिद्ध मंदिरांना भेट देऊ शकता. यात खालील ठिकाणांचा समावेश आहे.

  • गया – इथे तुम्ही बोधगया आणि लोकप्रिय विष्णुपद मंदिराला भेट देऊ शकता.
  • वाराणसी – इथे तुम्ही काशी विश्वनाथ मंदिर, विशालाक्षी मंदिर, अन्नपूर्णा मंदिर, काल भैरव मंदिर यांचे दर्शन घेऊ शकता. यासोबतच इथे तुम्हाला जगप्रसिद्ध गंगा आरतीचही सामील होता येईल.
  • अयोध्या – श्रीरामांचे जन्मस्थळ म्हणून लोकप्रिय असलेल्या अयोध्येत तुम्हाला राम मंदिराचे दर्शन घेता येईल.
  • प्रयागराज – गंगा,यमुना आणि सरस्वतीच्या त्रिवेणी संगमावर जाण्याची संधी तुम्हाला मिळेल. या संगमाच्या ठिकाणी स्नान करणे अत्यंत पवित्र मानले जाते.

किती खर्च येईल?

IRCTC ने यात्रेकरुंच्या बजेट आणि सोयीनुसार तीन भागांमध्ये पॅकेजला विभागले आहे. मुख्य म्हणजे, ‘भारत गौरव ट्रेन’ योजनेअंतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी भारतीय रेल्वे सुमारे ३३% सवलत देत आहे.
  • इकॉनॉमी (स्लीपर क्लास – १५० जागा): ₹१६,९०० प्रति व्यक्ती
  • कम्फर्ट (थर्ड एसी – ४०० जागा): ₹३१,००० प्रति व्यक्ती
  • सुपीरियर (सेकंड एसी – ५० जागा): ₹४३,५०० प्रति व्यक्ती

कोणकोणथ्या स्थानकावरुन रेल्वे पकडता येईल?

दक्षिण भारतातून सुरु होणारी ही रेल्वे तिरुनेलवेली येथून आपल्या प्रवासाला सुरुवात करेल. रस्त्यात ती विरुधुनगर, मदुरै, डिंडीगुल, त्रिची, विल्लुपुरम, चेंगलपट्टू, तांबरम, चेन्नई एगमोर, गुडूर आणि विजयवाडा या प्रमुख स्थानकांवर थांबेल. तुम्ही तुमच्या सुविधांनुसार यातील कोणत्याही स्थानकावरुन रेल्वे पकडू शकता.

Travel News : भारतातील सर्वात रहस्यमय किल्ला ज्याच्या भिंतींमधून होतो रक्तस्त्राव, रात्री कानावर पडतात भयानक किंकाळ्या

पॅकेजमध्ये कोणकोणत्या सुविधा दिल्या जातील?

टूर पॅकेजची खासियत म्हणजे तुम्हाला यात सर्व सोयीसुविधा पुरवल्या जातील. एकदा का तुम्ही पॅकेज बुक केले की तुम्हाला कोणतीही काळजी घेण्याची गरज भासणार नाही. यात तुमच्या राहण्याची व्यवस्था, दोन वेळच्या जेवणाची आणि प्रवास विमा यांचा समावेश असेल. बुकिंगसाठी तुम्ही irctctourism.com या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.

Web Title: 9 day spiritual tour to ayodhya kashi gaya and prayagraj irctc tour package launched

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 08:18 AM

Topics:  

  • IRCTC Tour Package
  • ram mandir
  • travel news

संबंधित बातम्या

IRCTC घेऊन आला जपान टूर पॅकेज, टोक्योपासून हिरोशिमपर्यंतची मजेदार सफर… जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
1

IRCTC घेऊन आला जपान टूर पॅकेज, टोक्योपासून हिरोशिमपर्यंतची मजेदार सफर… जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

Independence Day 2026 : 15 ऑगस्टला लाँग वीकेंडला प्लॅन करताय? मग मुंबईतील या ५ ठिकाणांना भेट द्या
2

Independence Day 2026 : 15 ऑगस्टला लाँग वीकेंडला प्लॅन करताय? मग मुंबईतील या ५ ठिकाणांना भेट द्या

एकेकाळी इंग्रजांनीच बनवलेले भारतातील हे ठिकाण परदेशांसाठी आहे बॅन, काय आहे कारण?
3

एकेकाळी इंग्रजांनीच बनवलेले भारतातील हे ठिकाण परदेशांसाठी आहे बॅन, काय आहे कारण?

आयआरसीटीसी-वन विभागाची हातमिळवणी! महाराष्ट्रातील वन्यजीव सफारीसाठी खास पर्यटन पॅकेजेस होणार लाँच
4

आयआरसीटीसी-वन विभागाची हातमिळवणी! महाराष्ट्रातील वन्यजीव सफारीसाठी खास पर्यटन पॅकेजेस होणार लाँच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.