फोटो सौजन्य - Social Media
मराठी रंगभूमी व छोट्या पडद्यावर आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रिया मराठे हिचं वयाच्या केवळ ३८व्या वर्षी निधन झालं. ती काही काळापासून कॉन्सरशी झुंज देत होती. तिच्या जाण्याने मराठी कलाक्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने भाववून टाकणारी ही कलाकार आज आपल्यात नाही, मात्र तिच्या जाण्याने एक महत्त्वाचा प्रश्न पुढे येतो – कॉन्सरबाबतची जागरूकता आणि वेळेत तपासणी.
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत महिलांच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं. विशेषत: २५ वर्षांनंतरच्या महिलांमध्ये कॉन्सरची काही सुरुवातीची लक्षणं दिसू लागतात, पण ती अनेकदा गांभीर्यानं घेतली जात नाहीत. वेळेत लक्ष न दिल्यास त्याचा परिणाम जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे या आजाराविषयी माहिती असणे आणि योग्य तपासणी करून घेणे अत्यावश्यक आहे.
महिलांमध्ये दिसून येणारी महत्त्वाची लक्षणे :
प्रतिबंधासाठी आवश्यक उपाय :
प्रिया मराठेचं जाणं ही फक्त कलाक्षेत्राची हानी नाही, तर समाजासाठीही एक संदेश आहे. कॉन्सर हा आजार वेळेत ओळखला तर त्यावर उपचार शक्य आहेत. मात्र, त्यासाठी जागरूकता आणि स्वतःच्या आरोग्याविषयी जबाबदारी घेणं आवश्यक आहे. महिलांनी आपल्या शरीरातील लक्षणांना दुर्लक्ष न करता योग्य वेळी तपासणी केली, तर अनेक जीव वाचू शकतात.
प्रिया मराठेसारख्या तेजस्वी तारकेचं अकाली मावळणं दुःखद असलं, तरी तिच्या स्मृतीतून आपण आरोग्याबाबत सजग होणं हाच खरी श्रद्धांजली ठरेल.