अनंत राधिका संगीत सोहळा
रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचा विवाह प्रसिद्ध उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट हिच्या सोबत होणार आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचे प्री वेडिंग फंक्शन पार पडले. तसेच लवकरच अनंत आणि राधिकाच्या विवाह सोहळा पार पडणार आहे. या विवाह सोहळ्याला जगभरातील आणि उद्योगपती, सेलिब्रिटी यांच्यासह अनेक लोक उपस्थित राहणार आहेत. १२ जुलैला अनंत आणि राधिका यांचा विवाह सोहळा पार पडणार असून या सोहळ्याची सध्या जोरदार तयारी सुरु आहे.
अनंत- राधिका यांचा संगीत सोहळा ५ जुलैला पार पडणार आहे. या संगीत सोहळ्यासाठी बॉलिवूड हॉलिवूडचे अनेक कलाकार आणि गायक सहभागी होणार असून अनेक उद्योगपती, सेलिब्रिटी संगीत सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या खास संगीत सोहळ्यासाठी थीम देखील ठरवण्यात आली आहे. संगीत सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या सर्व पाहुण्यांना ही थीम फॉलो करावी लागणार आहे.चला तर जाणून घेऊया नेमकी कोणती थीम संगीत सोहळ्यासाठी ठरवण्यात आली आहे.
मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचा विवाह सोहळा शाही थाटात पार पडणार आहे. लग्नाच्या ६ दिवस आधीच संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. काही दिवसांआधी त्यांच्या विवाह सोहळ्याची पत्रिका सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. या पत्रिकेमध्ये कुटुंबातील सर्व लोकांची नावे नमूद करण्यात आली आहेत. ५ जुलै ला संध्याकाळी ७ वाजता अनंत आणि राधिका यांचा संगीत सोहळा चालू होणार असून अनेक गायक या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाह सोहळ्यासाठी खास ड्रेसकोड ठरवण्यात आला आहे. हा ड्रेसकोड अंबानी कुटुंबासह सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या सर्व पाहुण्यांना फॉलो करावा लागणार आहे. अंबानी कुटुंबाने संगीत सोहळ्यासाठी ‘इंडियन रिगल ग्लॅम’ ही भारतीय पारंपरिक थीम ठरवली आहे. तसेच त्यांचा संगीत सोहळा भारतीय असणार आहे.