मुलतानी माती चेहऱ्याला लावताना काय काळजी घ्यावी जाणून घ्या (फोटो सौजन्य - Pinterest)
मुलतानी मातीला एक नैसर्गिक क्लिन्झर मानले जाते. ते चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल, धूळ आणि घाण काढून टाकण्यास मदत करते. उन्हाळ्यात त्वचेला थंडावा देण्यासाठीही याचा वापर केला जातो. तेलकट त्वचा असलेले लोक याला पसंती देतात कारण यामुळे चेहऱ्यावर ताजेपणा जाणवतो.
कोंड्यापासून मुरुमांपर्यंत अनेक समस्यांवर मुलतानी माती आहे रामबाण उपाय, जाणून घ्या फायदे
मुलतानी मातीचा वापर कसा करायचा ते आधी जाणून घेऊया
तुम्ही याचा वापर किती वेळा करावा?
मुलतानी माती रोज वापरणे योग्य नाही तर तुम्ही याचा वापर कसा आणि किती वेळा करावा हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. तेलकट त्वचा असलेल्या व्यक्तींनी याचा वापर आठवड्यातून दोनदा करावा, तर कोरडी आणि संवेदनशील त्वचा असलेल्या व्यक्तींनी याचा वापर आठवड्यातून एकदाच करावा. मुलतानी माती योग्य पद्धतीने वापरल्यास तुमच्या चेहऱ्यावरची चमक नेहमीच चांगली राहील.
टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.






