नाते कोणतेही असो आपण कधी ना कधी भावनिकरित्या दुखावतो. त्यावेळी आपले रागावर कंट्रोल राहत नाही. आणि आपण भांडणात एक्स्प्रेस सुटतो. स्वतःवर केलेल्या आरोपांचा किंवा प्रश्नांचा विचार न करता वाद घालू लागतो. भांडताना किंवा वाद सुरू असताना तेव्हा लोकांना उत्तर देण्यापूर्वी स्वतःला काही प्रश्न विचारा, असा सल्ला सायकॉलॉजिकल काऊंसलर ल्युसिल शेकलटन यांनी दिला आहे.
तुम्ही कोणच्या विषयावर भांडण करत आहात, आणि त्या मागील कारण तसेच ज्या विशयाला घेऊन भांडण करत आहात त्या विषयवर वाद करण योग्य आहे का? यांचा विचार करायला हवा.
तुम्ही खूप चिडलेले असता तेव्हा तुम्ही कसे रिऍक्ट होता. हे स्वतःला विचारा. तुमच्या अशा रिऍक्शनचा नात्यावर काय परिणाम होतो याचाही विचार करा. चिडून, भांडून काही फायदा किंवा तोटा होणार आहे का?, याचाही विचार करा.
तुम्ही कोणाच्या प्रश्नावर कशाप्रकारे प्रतिसाद देता. त्यावेळी तुमची शारिरीक हालचाल,बोलण्याची पद्धत, हावभाव कसे आहेत, याचा विचार करा. तुमच्या या प्रतिक्रियेचा नात्यावर काय परिणाम होईल, हा विचारही करा.
तूम्ही भांडल्यानंतर ज्या प्रतिक्रीया देता, त्यांचा नंतर तूम्हाला पश्चाताप होणार नाही ना, याचा आधी विचार करा.






