श्रावण महिना सुरु झाला आहे. या महिन्याला हिंदू धर्मात या महिन्याला सर्वात पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात अनेकजण उपवास-व्रत करत असतात. या महिन्यात फक्त धार्मिक गोष्टींचेच नाहीतर आरोग्याच्या दृष्टिकोनातून सांगितल्या जाणाऱ्या काही विशेष नियमांचे पालन करण्याचा सल्ला दिला जातो. श्रावण महिना जुलै-ऑगस्ट महिन्यात सुरु होतो. या काळात पावसाळा सुरु असतो ज्यामुळे या काळात सर्वत्र आद्रता असते. आद्रतेमुळे फळे, भाज्या आणि इतर खाद्यपदार्थांमध्ये बॅक्टेरिया किंवा विषाणू लवकर वाढतात.
त्यामुळेच या ऋतूत आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देणे फार गरजेचे असते. संपूर्ण पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्या खाण्यास मनाई केली जाते. त्याचबरोबर श्रावणात वांगी, फणस, फ्लॉवर या भाज्यांचे सेवन टाळावे. याचबरोबर श्रावणात काही फळांचे सेवनदेखील टाळायला हवे. या फळांच्या सेवनाने आजारी पडण्याचा धोका वाढू शकतो.
अनेकजण फळांसोबत उपवासाच्या वेळी काकडीचे सेवन करतात. सलाडच्या स्वरूपात काकडीचे अधिकतर सेवन केले जाते. मात्र काकडी खाल्ल्याने पोटदुखी, फुगणे आणि गॅससारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे याचे सेवन टाळावे.
पाण्याने भरपूर रसाळ कलिंगड खाल्ल्याने शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते. डिहायड्रेशन टाळण्यासाठी तुम्ही उन्हाळ्यात टरबूज खाऊ शकता. मात्र पावसाळ्यात याचे सेवन करणे टाळावे. या ऋतूत कलिंगडाचे सेवन केल्याने खाल्ल्याने सर्दी, खोकला, पोट फुगणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
फणस हा अनेकांच्या आवडीच्या फळ आहे. अनेकांना कच्या फणसाची भाजीदेखील खायला फार आवडते. मात्र पावसाळ्याच्या दिवसात फणसाचे सेवन कधीही करू नये. फणसामध्ये आहारातील फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे फणस खाल्ल्याने पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.