Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Weight Loss Tips : १० दिवसांत करा ५ किलो वजन कमी, डाॅ.उपासना यांनी शेअर केला खास डाएट प्लॅन; बेली फॅट कमी करण्यास करेल मदत

Diet Plan : वजन कमी करणं काही सोपी गोष्ट नाही. तुम्हालाही कमी वेळेत जास्तीत जास्त वजन कमी करायचे असेल तर डाॅक्टरांनी सांगितलेला हा डाएट प्लॅन तुम्ही नक्कीच फाॅलो करायला हवा. दाव्यानुसार, हा डाएट प्लॅन फाॅलो करुन तुम्ही १० दिवसात ५ किलो वजन कमी करु शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 25, 2026 | 08:15 PM
Weight Loss Tips : १० दिवसांत करा ५ किलो वजन कमी, डाॅ.उपासना यांनी शेअर केला खास डाएट प्लॅन; बेली फॅट कमी करण्यास करेल मदत

Weight Loss Tips : १० दिवसांत करा ५ किलो वजन कमी, डाॅ.उपासना यांनी शेअर केला खास डाएट प्लॅन; बेली फॅट कमी करण्यास करेल मदत

Follow Us
Follow Us:
  • वजन नियंत्रणासाठी आहाराच्या वेळा आणि सवयींमध्ये बदल महत्त्वाचे ठरू शकतात.
  • दिवसातील खाण्याचे नियोजन शरीराच्या चयापचय प्रक्रियेवर परिणाम करू शकते.
  • सातत्याने योग्य दिनचर्या पाळल्यास अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत मिळू शकते.
वाढते वजन आजकाल अनेकांसाठी समस्येचे कारण ठरले आहे. पोटोवरची चरबी फक्त आपल्याला लठ्ठ बनवत नाही तर यामुळे आरोग्याच्या समस्या देखील उद्भवतात. हेच कारण आहे की, अनेकदा डाॅक्टर देखील लोकांना आपले वजन नियंत्रणात ठेवण्याचा सल्ल देत असतात. एकदा का वजन वाढले की ते कमी करणे फार कठीण होते. तुम्हालाही झटपट अवघ्या काही दिवसांतच आपल्या पोटावरची चरबी कमी करायची असेल तर आजची बातमी तुमच्या कामाची आहे.

वजन कमी करण्यासाठी फक्त व्यायम करुन काही होत नाही, यासाठी आपल्या आहारातही काही बदल करणे महत्त्वाचे ठरते. योग्य वेळी जर तुम्ही योग्य आहाराचे सेवन केले तर याचा तुमच्या वजनावर चांगलाच परिणाम होऊ शकते. आयुर्वेदिक डाॅक्टर उपासना वोहरा यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर खास डाएट प्लॅन शेअर केला आहे. हा डाएट प्लॅन जर तुम्ही नियमितपणे दररोज फाॅलो केला तर याच्या मदतीने फक्त १० दिवसांत तुम्ही तुमचे ५ किलो वजन कमी करु शकता. चला या डाएट प्लॅनविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Kitchen Tips : न मारता स्वयंपाकघरातून मुंग्यांना कसं पळवून लावायचं? ही घरगुती ट्रिक येईल कामी

७०-८०% बेली फॅट होईल कमी

डॉ उपासना वोहरा यांनी सांगितले की, जर तुमचे वजन खूप जास्त वाढले असेल किंवा पोटाची ढेरी खूपच दिसून येत असेल तर हा १० दिवसांचा डाएट प्लॅन तुम्ही नक्कीच फाॅलो करायला हवा. यामुळे तुमचे वजन कमी होण्यास तसेच पोट आणि कमरेवरील ७०-८०% अतिरिक्त चरबी वितळण्यास मदत होईल. ज्या लोकांकडे व्यायामासाठी फार वेळ नसतो ते हा डाएट फाॅलो करुन आपले अधिकाधिक वजन कमी करु शकतात.

अशाप्रकारे करा सकाळची सुरुवात

डाॅक्टरांच्या मते, झोपेतून उठताच सर्वात आधी एक ग्लास कोमट गरम पाण्याचे सेवन करा. यामुळे शरीर हायड्रेट होण्यास मदत होईल. यामुळे पचनक्रिया सक्रिय होते ज्यामुळे पोट साफ होण्यास मदत मिळते. यासोबतच यामुळे शरीरातील मेटाबाॅलिजम देखील बूस्ट होण्यास मदत होते.

सकाळचा नाश्ता कधी आणि कसा करावा?

डाॅक्टर उपासना यांच्या मते. खाण्या-पिण्याचा रुटीन सकाळी १० वाजल्यापासून सुरु करावा. सकाळच्या नाश्त्यात तुम्हाला कोणतेही फळ किंवा सीजनल फळाचे सेवन करायचे आहे. फळांसा रस पिणे टाळा कारण त्यात फक्त साखर असते. फळाचे डायरेक्ट सेवन केल्यास शरीराला फायबर आणि इतर पोषकतत्वांचा साठा मिळतो.

दुपारचे जेवण किती वाजता करावे?

या डाएट प्लॅननुसार तुम्हाला तुमचे दुपारचे जेवण अडीज किंवा तीन वाजताच्या सुमारास करायचे आहे. दुपारच्या जेवणात तुम्ही घरगुती जेवणाचा जसे की डाळ, भात, भाजी, चपाती, सॅलड यांचा समावेश करु शकता. यावेळी तुम्ही पोटभर जेवण करु शकता.

पावसाळ्यात केस राहतील मुलायम आणि सॉफ्ट! जास्वदींच्या फुलांपासून घरी तयार करा नॅचरल हेअर मास्क, केसांना मिळेल भरपूर पोषण

संध्याकाळी ५ नंतर काहीही खाऊ नका

डाॅ.उपासना यांच्या मते, संध्याकाळी ५ वाजता तुम्हाला तुमचा शेवटचा आहार घ्यायचा आहे. यात तुम्ही पोहा, उपमा, इडली, सँडविच असे पदार्थ बनवून खाऊ शकता. याव्यतिरिक्त यावेळी तुम्ही घरगुती पण कमी तेलात तयार केलेल्या अन्नाचेही सेवन करु शकता. संध्याकाळी ५ वाजता तुम्ही डिनर कराल ज्यानंतर पाणी सोडून तुमच्या पोटात काहीच जाणार नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा १० वाजता तुम्ही सकाळचा नाश्ता कराल आणि पुढील रुटीन फाॅलो कराल. अशाप्रकारे जर तुम्ही सलग १० दिवस डाएट केलंत तर तुमच्या पोटावरील चरबी कमी होण्यास नक्कीच मदत होईल.

Web Title: Ayurvedic doctor shares 10 day diet plan to lose 5 kg weight and reduce belly fat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Health Tips
  • lifestyle news
  • Weight loss

संबंधित बातम्या

Fitness Tips : जिम लावली नाही तरीही २ वर्षांत १८ किलो वजन केले कमी, तरुणीने शेअर केला सीक्रेट फिटनेस प्लॅन
1

Fitness Tips : जिम लावली नाही तरीही २ वर्षांत १८ किलो वजन केले कमी, तरुणीने शेअर केला सीक्रेट फिटनेस प्लॅन

मान आणि पाठीवर साचलेला मळ दूर करायचाय? मग घरीच अशाप्रक्रारे तयार करा बेसन-दह्याचा नैसर्गिक क्लींजर
2

मान आणि पाठीवर साचलेला मळ दूर करायचाय? मग घरीच अशाप्रक्रारे तयार करा बेसन-दह्याचा नैसर्गिक क्लींजर

दिवसभर शरीराला हायड्रेड ठेवण्यासाठी नक्की किती पाण्याचे सेवन करावे? योग्य प्रमाण जाणून घ्या
3

दिवसभर शरीराला हायड्रेड ठेवण्यासाठी नक्की किती पाण्याचे सेवन करावे? योग्य प्रमाण जाणून घ्या

Women Libido: महिलांचे लिबिडो वाढवून शारीरिक संबंध सुधारण्यासाठी वरदान ठरते मेथी, जाणून घ्या फायदे
4

Women Libido: महिलांचे लिबिडो वाढवून शारीरिक संबंध सुधारण्यासाठी वरदान ठरते मेथी, जाणून घ्या फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.