गायत्री मंत्र हा अत्यंत पवित्र मंत्र मानला जातो. योगाभ्यासातही या मंत्राला आणि त्याच्या उच्चारणाला महत्त्व आहे. गायत्री मंत्र हा हिंदू धर्मातील पवित्र मंत्रांपैकी एक आहे. अनेकदा गरोदरपणामध्ये गायत्री मंत्राचे उच्चारण करण्याचा सल्ला देण्यात येतो. आपल्या मुलांची नावं तुम्हाला युनिक ठेवायची असतील अथवा पवित्र स्त्रोत्रावरून आणि उच्चारणावरून ठेवायची असतील तर तुम्ही गायत्री मंत्रामधील काही नावांचा विचार करू शकता.
गायत्री मंत्रामधील काही संस्कृत शब्दावरून तुम्ही आपल्या मुलांसाठी नावांची निवड करू शकता. ही नावे कोणती आहेत आणि त्याचा अर्थ काय आहे याबाबत आपण या लेखातून जाणून घेऊया (फोटो सौजन्य – Canva)
गायत्री
गायत्री हे गायत्री मंत्राच्या सुरूवातीलाच येणारे नाव आहे. आपल्या घरी मुलीचा जन्म झाला असेल तर तिच्यासाठी गायत्री या नावाचा विचार करू शकता. गायत्री या नावाचा अर्थ आहे वैदिक मंत्र, सूर्य, एक पवित्र कविता, देवीचे नाव. त्यामुळे या पवित्र नावाची निवड तुम्ही तुमच्या मुलीसाठी करू शकता.
[read_also content=”ह वरून ठेवाल मुलाचे नाव होईल भरभराट https://www.navarashtra.com/lifestyle/hindu-baby-boy-names-starts-with-h-with-meaning-540959/”]
वेद
दोन अक्षरी असणारे हे नाव आपल्या मुलासाठी नक्कीच योग्य ठरू शकते. ज्ञानाचा भंडारा असा या नावाचा अर्थ आहे. आपल्याकडे पूर्वपरंपरागत हिंदू धर्मात वेद, उपनिषदे आणि स्त्रोत्रांना महत्त्व आहे. त्यामुळे तुम्हाला आपल्या मुलाचे नाव काहीतरी वेगळे ठेवायचे असेल तर गायत्री मंत्रांशी संबंधित असणारे वेद हे नाव अत्यंत युनिक आणि वेगळे आहे.
देवस्य/देवस्या
मुलाचे अथवा मुलीचे अथवा जुळी मुलं-मुली घरात जन्माला आले असतील आणि तुम्ही वेगळ्या नावाचा शोध घेत असाल तर देवस्य/देवस्या या नावांचा तुम्ही उपयोग करून घेऊ शकता. देवासमान असणारा अथवा देवीसमान असणारी असा या नावाचा अर्थ आहे. सध्याच्या नावांपेक्षा काही वेगळा पर्याय तुम्ही शोधत असाल तर या नावाचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
तत्व
प्रत्येक माणूस हा स्वतःच्या विचारांनी आणि आपापल्या तत्वानुसार जगत असतो. हेच नाव तुम्ही तुमच्या मुलासाठी ठेऊ शकता. गायंत्री मंत्राशी संबंधित असणारा हा शब्द आपल्या मुलाच्या नावासाठी निवडू शकता. वेगळ्या आणि युनिक नावाचा विचार करत असाल तर तत्व हे नाव अत्यंत योग्य ठरू शकते.
अरूणिमा
सकाळी पसरलेली लाली असा अरूणिमा या नावाचा अर्थ आहे. सकाळच्या प्रहरी म्हटला जाणारा गायत्री मंत्र ज्याप्रमाणे शुद्ध आणि पवित्र असतो तसंच ही लाली मनाला उभारी देते. आपल्या मुलीसाठी तुम्ही या नावाचा विचार करू शकता.
वरेण्यम
मुलासाठी नाव शोधत असाल तर वरेण्यम या संस्कृत नावाचा विचार नक्कीच करू शकता. प्रधान, मुख्य, पूजनीय असा या नावाचा अर्थ असून तुमच्या मुलासाठी युनिक नाव म्हणून या नावाची निवड होऊ शकते. हे अत्यंत युनिक नाव असून रोजच्या नावांपैकी अथवा ऐकीव नावांपैकी नाही.
प्रणव
ओंकार अथवा परमेश्वर असा प्रणव या नावाचा अर्थ असून आपल्या मुलासाठी तुम्ही प्रणव या नावाची निवड करू शकता. गायत्री मंत्राप्रमाणेच पवित्र असे हे नाव आपल्या बाळासाठी तुम्ही निवडू शकता.
निर्वाण
अत्यंत समजूतदार अथवा मॅच्युअर व्यक्ती असा निर्वाण या नावाचा अर्थ होतो. याप्रमाणेच अत्यंत शांत, निश्चल, पवित्र असाही निर्वाण या नावाचा अर्थ मानला जातो. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलासाठी निर्वाण या नावाची नक्कीच निवड करू शकता.