हिंदू धर्मात कोणत्याही शुभकार्याला अथवा अगदी रोज काही घरामध्ये पूजेच्या वेळी स्वस्तिक काढण्याची परंपरा पूर्वपरंपरागत चालत आली आहे. स्वस्तिक हे अत्यंत शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रात स्वस्तिक या चिन्हाला खूपच महत्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार घरात हळदीचे स्वस्तिक काढण्याने अनेक लाभ होतात.
स्वस्तिक चिन्ह काढण्याने अनेक शुभ गोष्टींनी दिवसाची सुरूवात होते. त्यामुळे देवाची पूजा करताना रोज स्वस्तिक काढणे शुभ आणि चांगले ठरते. मात्र स्वस्तिक काढण्यामागे ज्योतिषाचे काही महत्त्वाचे नियम आहेत, जे सर्वांनी लक्षात ठेवायला हवे. याबाबत गुरूजी सिद्धेश यांनी काही नियम सांगितले आहेत, जाणून घ्या. (फोटो सौजन्य – iStock)
[read_also content=”वास्तुशास्त्रानुसार कपाट कोणत्या दिशेला ठेवावे https://www.navarashtra.com/lifestyle/what-is-the-correct-direction-to-place-the-cupboard-545099.html”]
स्वस्तिक चिन्ह काढण्याचे नियम आणि फायदे
लक्ष्मीशी संबंधित आहे स्वस्तिक चिन्ह
लक्ष्मी आणि कुबेर देवाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपल्या कुटुंबात हळदीसह स्वस्तिक चिन्ह काढावे. असे केल्याने घरातील सर्व सदस्यांवर देवी लक्ष्मीची कृपा होते. याशिवाय घरात आनंदी वातावरण निर्माण होऊन सकारात्मक ऊर्जा संचारते. तसेच घरी काढलेले स्वस्तिक चिन्ह नकारात्मक ऊर्जा नष्ट करते. ज्योतिष शास्त्रानुसार घरगुती मंदिरात पूजा करताना स्वस्तिक चिन्ह हळदीने बनवावे. यामुळे घरातील पावित्र्य राखले जाते.
टीपः या लेखामध्ये दिलेली माहिती ही अभ्यासानुसार आणि तज्ज्ञांच्या माहितीनुसार देण्यात आलेली आहे. याप्रमाणेच सगळे घडेल असा कोणताही दावा आम्ही करत नाही.