महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा फटका (ai gemini)
अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी
बंगालच्या उपसागरात तयार झाला कमी दाबाचा पट्टा
अनेक जिल्ह्यात हवामानात झाला बदल
Unseasonal Rain In Maharashtra: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात काहीसा बदल पाहायला मिळत आहे. अचानक तापमानात वाढ झाल्याने उकाडा देखील वाढला आहे. हवामान विभागाने देशातील अनेक राज्यांना पावसाचा इशारा दिला होता. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, महाराष्ट्रात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी राजाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. बीड, यवतमाळमध्ये अवकाळी पावसाची हजेरी लावली आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा, वडवणी परिसरात जोरदार पाऊस झाल्याचे समोर आले आहे. यवतमाळच्या राळेगाव तालुक्यात अवकालीचा तडाखा बसला आहे. अवकाळी पावसाचा शेती पिकांना फटका देखील बसला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे त्याचा परिणाम महाराष्ट्रावर देखील झाला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतीच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील पावसाने हजेरी लावली. त्यामुळे आंबा पिकला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आंबा शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
India Rain Alert: तुम्ही ‘या’ राज्यांमध्ये राहताय? मग जरा जपूनच; वरुणराजा असा कोसळणार की…
हवामानातील बदल आणि अवकाळी पावसाचा काजू आणि आंबा फळावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बागायतदारांची चिंता वाढली आहे. नागपूर जिल्ह्यात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मराठवाडा, विदर्भात देखील ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे.
अनेक राज्यांना पावसाचा इशारा
उत्तर भारतात सातत्याने उष्णतेचा पारा वाढत असल्याचे दिसून येत आहे. राजधानी दिल्लीत तापमान 30 अंशापेक्षा जास्त वर गेले आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे अनेक रजायनमध्ये हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार आज आणि उद्या अनेक राज्यांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Maharashtra Weather: भारतात पुन्हा पावसाची शक्यता! वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे तापमानाचा ‘यू’टर्न
आज आणि उद्या देशातील मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, तेलंगणा,आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पावसासोबतच जोरदार वारे देखील वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.त्यामुळे येत्या 48 तासांमध्ये तामिळनाडू राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तर राजधानी दिल्लीत तापमानात वाढ होताना दिसून येत आहे.






