Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गोव्याला जाऊन कंटाळलात? मग यावेळी निवडा पदुचेरीचा पर्याय, फक्त मंदिर आणि बीच नाही इथे फिरण्यासाठी आहेत असंख्य ठिकाणे

Pondicherry Places To Visit : त्याच त्याच नेहमीच्या ठिकाणांना भेट देऊन कंटाळा आला असेल तर यावेळी पदुचेरीला तुम्ही नक्कीच भेट द्यायला हवी. इथे एकेकाळी फ्रेंच वसाहस असल्याने आजही फेंच संस्कृतीची झलक इथे पाहायला मिळते.

  • By नुपूर भगत
Updated On: May 28, 2026 | 08:24 AM
गोव्याला जाऊन कंटाळलात? मग यावेळी निवडा पदुचेरीचा पर्याय, फक्त मंदिर आणि बीच नाही इथे फिरण्यासाठी आहेत असंख्य ठिकाणे

गोव्याला जाऊन कंटाळलात? मग यावेळी निवडा पदुचेरीचा पर्याय, फक्त मंदिर आणि बीच नाही इथे फिरण्यासाठी आहेत असंख्य ठिकाणे

Follow Us
Follow Us:
  • समुद्रकिनारे, रंगीबेरंगी रस्ते आणि ऐतिहासिक वास्तूंमुळे हे ठिकाण पर्यटकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.
  • भारतात असूनही इथल्या वातावरणात परदेशी संस्कृतीची अनोखी झलक अनुभवायला मिळते.
  • शांतता, निसर्ग आणि वेगळ्या पर्यटन अनुभवाच्या शोधात असणाऱ्यांसाठी हे ठिकाण खास ठरू शकते.
भारताच्या दक्षिण किनाऱ्यावर वसलेले पदुचेरी हे ठिकाण फिरण्यासाठीचे एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. मुख्य म्हणजे इथे फिरण्यासाठी फक्त एक किंवा दोन ठिकाणे नाहीत तर अशी असंख्य सुंदर आणि नेत्रदिपक ठिकाणे आहेत ज्यांची मजा तुम्ही एकाच ट्रीपमध्ये घेऊ शकता. मागील काही काळापासून पर्यटनासाठी लोकांचा कल ऑफबीट डेस्टीनेशनकडे अधिक वाढला आहे अशात पदुचेरी तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरु शकतो. त्याच त्याच ठिकाणी जाऊन कंटाळा असेल तर यावेळी काही वेगळं ट्राय करा आणि एकदा तरी पदुचेरीला भेट द्या. एकेकाळी इथे फ्रेंच वसाहत असल्याने आजही फ्रेंच संस्कृतीची झलक इथे पाहायला मिळते. इथे रंगीत रस्ते, धार्मिक ठिकाणं, समुद्रकिनारे आणि काही लोकप्रिय बाजारपेठांना भेट देता येऊ शकते. चला पदुचेरीत तुम्हाला कोणकोणत्या ठिकाणी फिरायला मिळेल याची माहिती जाणून घेऊया.

Travel News : पाण्यामध्ये तरंगणारं नॅशनल पार्क, इथे होडीत बसून केली जाते जंगल सफारी

श्री अरबिंदो आश्रम

हे आश्रण पदुचेरीतील एक लोकप्रिय आध्यात्मिक केंद्र आहे. हे आश्रम श्री अरबिंदो आणि मीरा अल्फासा (मदर) यांनी स्थापित केला होता. या दोघांचीही समाधी आश्रमात आजही पाहायला मिळते. आध्यात्मिक शांतीच्या शोधात असाल तर या ठिकाणी तुम्ही भेट द्यायला जाऊ शकता. इथे मेडिटेशन आणि म्यूजियमची सुविधा उपलब्ध आहे.

फ्रेंच क्वॉर्टर

फ्रेंट क्वार्टर हे ठिकाण तुम्हाला भारतातच फ्रांसमध्ये असल्याचा फिल देऊन जाईल. हलक्या रंगाच्या इमारती, लहान कॅफे आणि दगडांपासून तयार करण्यात आलेले अनोखे रस्ते ठिकाणाचे साैंदर्य आणखी वाढवते. इथे फ्रेंच आणि तामिळ संस्कृतीचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो. १७ व्या शतकात फ्रेंच लोकांनी इथे आपली वसाहत स्थापन केली होती ज्यामुळे आजही इथे त्याकाळच्या काही सुंदर गोष्टी पाहायला मिळतात. हे ठिकाण व्हाईट टाऊन या नावानेही ओळखले जाते.

भारती पार्क

भारती पार्क हे व्हाईट टाऊनच्या मध्यभागी वसलेले एक सुंदर आणि ऐतिहासिक उद्यान आहे. इथे तुम्हाला सुंदर बागा, फाऊंटन आणि अनोख्या शैलीतील रस्ते पाहता येतात. निसर्गाचा सानिध्यात वेळ घालवायचा असेल किंवा कुटुंबासोबत फेरपटका मारायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही नक्कीच भेट द्यायला हवी. इथे अनेक ऐतिहासिक पुतळे आणि कृत्रिम तलाव देखील आहे.

पदुचेरी संग्रहालय

इतिहासप्रेमी असाल तर हे ठिकाण तुमच्या आवडीचे ठरणार आहे. या ठिकाणी चोळ आणि पल्लव राजवंशातील काही प्राचीन मूर्त्या, नाणी, फर्निचर आणि काही सुबक कालाकृत्या पाहायला मिळतात. पदुचेरीच्या समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे दर्शन करण्यासाठी हे ठिकाण एक चांगला पर्याय ठरते. पदुचेरी संग्रहाल देखील व्हाईट टाऊन भागात वसले आहे.

मनकुला विनयगर मंदिर

पदुचेरीत वसलेले हे प्राचीन हिंदू मंदिर सुमारे १०० वर्षे जुने असल्याचे म्हटले जाते. याची स्थापना १७ व्या शतकात करण्यात आली होती. मंदिर भगवान गणेशाला समर्पित असून इथे शांततामय वातावरण अनुभवायला मिळते. असे मानले जाते की, फ्रेंच वसाहतीदरम्यान फ्रेंच लोकांनी हे मंदिर तोडण्याचा खूप प्रयत्न केला होता पण भक्तांच्या रोषामुळे त्यांना असं करता आलं नाही. मंदिराचा प्रवेशद्वार फार भव्य आहे आणि मंदराच्या आत सोन्याच्या मुलाम्याने सजवलेली गणेशमूर्ती आहे. इथे ‘लक्ष्मी’ एक हत्ती देखील आहे जो भाविकांना आपल्या सोंडेने आशिर्वाद देत असल्याचे सांगितले जाते.

समुद्रकिनाऱ्यांचाही लुटु शकता आनंद

पदुचेरीमध्ये निरनिराळे समुद्रकिनारे देखील आहेत ज्यांना भेट देऊन तुम्ही तिथे एक चांगला वेळ घालवू शकता. स्वच्छ पाणी, वाळू, सुंदर वातावरण यामुळे कुटुंबासोबत इथे छान वेळ घालवता येऊ शकतो.

India’s Mini Israiel: कमी बजेटमध्ये विदेश यात्रा करायचीये? मग भारतातील या ठिकाणाला भेट द्या

प्रोमेनेड बीच – पदुचेरीतील हे सर्वात लोकप्रिय समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. याला राॅक बीच या नावानेही ओळखले जाते. हा वाळूचा समुद्रकिनारा नसून येथे लाटा रोखण्यासाठी इथे मोठ्या काळ्या खडकांचा वापर करण्यात आला आहे. संध्याकाळी सूर्यास्ताचा आनंद घेत तुम्ही पार्टनरसोबत इथे छान वेळ घालवू शकता. इथे स्थानिक पदार्थ आणि अनेक कॅफे आहेत जिथे पर्यटकांची रेलचेल पाहायला मिळते.

पॅराडाईस बीच – हा पुदचेरीतील एक शांत, स्वच्छ आणि सुंदर समद्रकिनारा आहे. इथे सोनेरी वाळू, घनदाट झाडी आणि डाॅल्फीन पाहता येऊ शकते. तुम्ही इथे अनेक वाॅटर स्पोर्ट्सचाही आनंद घेऊ शकता.

क्वाएट बीच – नावाप्रमाणेच हे बीच इथल्या शांत वातावरणासाठी ओळखले जाते. गर्दीच्या वातावरणापासून दूर कुठे शांत वेळ घालवायचा असल्यास हे बीच तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरेल. इथे लाटांचा आवाज आणि आजूबाजूचे निसर्गरम्य दृष्य पाहायला मिळते ज्यामुळे मनाल वेगळेच समाधान मिळते.

Web Title: Best places to visit in pondicherry famous beaches french quarter travel guide

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 08:23 AM

Topics:  

  • places to visit
  • Pondicherry
  • travel news

संबंधित बातम्या

नेपाळमधील पूरग्रस्त भागाचे जगाला गूढ आकर्षण! पुराचा धोका असूनही भारतासह परदेशी पर्यटकांची गर्दी इथे का?
1

नेपाळमधील पूरग्रस्त भागाचे जगाला गूढ आकर्षण! पुराचा धोका असूनही भारतासह परदेशी पर्यटकांची गर्दी इथे का?

गॅस सिलेंडरच नाही, रेल्वेतून या वस्तू नेण्यासही आहे मनाई, तुम्हाला नियम माहिती आहेत का?
2

गॅस सिलेंडरच नाही, रेल्वेतून या वस्तू नेण्यासही आहे मनाई, तुम्हाला नियम माहिती आहेत का?

सुंदर आणि रहस्यमय… अमर लोकांच्या पुलाची कथा, जाणून घ्या कुठे आहे Bridge Of The Immortals
3

सुंदर आणि रहस्यमय… अमर लोकांच्या पुलाची कथा, जाणून घ्या कुठे आहे Bridge Of The Immortals

MakeMyTrip Axis Bank Offer : फिरण्याचा प्लॅन करताय? मेकमायट्रिप अन् ॲक्सिस बँक देतंय मोठं डिस्काउंट, मिळणार बंपर सूट
4

MakeMyTrip Axis Bank Offer : फिरण्याचा प्लॅन करताय? मेकमायट्रिप अन् ॲक्सिस बँक देतंय मोठं डिस्काउंट, मिळणार बंपर सूट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.