Akot BJP MIM Alliance : भाजपने तत्त्वांना मुरड घातली? अकोट नगरपालिके: MIM शी आघाडी; नव्या राजकीय समीकरणाची चर्चा
नुकत्याच झालेल्या अकोट नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या माया धुळे या नगराध्यक्षपदी निवडून आल्या असल्या, तरी भाजपला बहुमत मिळवता आलेले नाही. ३५ सदस्यांच्या नगरपालिकेपैकी ३३ जागांसाठी निवडणूक झाली असून, भाजपला केवळ ११ जागांवर समाधान मानावे लागले आहे.
याच साठी केला होता अट्ट्हास…; डोनाल्ड ट्रम्पचा व्हेनेझुएलाच्या हृदयावर घाला, जगात खळबळ
बहुमताअभावी सत्तास्थापनेसाठी भाजपने आपल्या नेतृत्वाखाली ‘अकोट विकास मंच’ची स्थापना केली आहे. या मंचात भाजपनंतर सर्वाधिक म्हणजे पाच जागा जिंकणारा एमआयएम पक्ष सहभागी झाला असून, त्यामुळे भाजप–एमआयएम युतीचे नवे समीकरण पुढे आले आहे.
या आघाडीत ठाकरे गटाची शिवसेना, शिंदे गटाची शिवसेना, अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस तसेच बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष यांचाही समावेश आहे. या नव्या आघाडीची अधिकृत नोंदणी मंगळवारी अकोला जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. अकोट नगरपालिकेतील या अनपेक्षित युतीमुळे राज्यातील स्थानिक राजकारणात नवी चर्चा सुरू झाली असून, सत्तेसाठी भाजपने घेतलेल्या भूमिकेवर टीकाही होत आहे.
भाजपने अकोट नगरपालिकेत भाजपन अकोट विकास मंच स्थापन केला आहे. अकोट विकास मंचात भाजपनंतर सर्वाधिक जागा एमआयएमला मिळाल्या आहेत. त्यामुळे भाजपने एमआयएमशी युती केली आहे. या युतीत ठाकरे आणि शिंदे यांची शिवसेना, अजित पवार आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्षाही सहभागी झाला आहे. कालच जिल्हाधिकारी कार्यालयात या नव्या युतीची नोंदणी करण्यात आली आहे.
भाजपचा बिनविरोधचा डाव फसला; काँग्रेस उमेदवाराने नाकारली 10 लाखांची ऑफर
अकोट नगरपालिकेत स्थापन झालेल्या नव्या राजकीय आघाडीत आता भाजपचा ‘व्हिप’ लागू राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या आघाडीतील सर्वच पक्षांच्या नगरसेवकांना भाजपचा व्हिप पाळणे बंधनकारक असणार आहे. भाजपचे नगरसेवक रवि ठाकूर यांची या नव्या आघाडीच्या गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
१३ जानेवारी रोजी होणाऱ्या उपनगराध्यक्षपद आणि स्वीकृत सदस्यांच्या निवडीत ही आघाडी एकत्रितपणे मतदान करणार आहे. सध्या ३३ सदस्यांच्या नगरपालिकेत या आघाडीकडे २५ नगरसेवकांचे संख्याबळ असून, नगराध्यक्षा माया धुळे यांचा समावेश केल्यास एकूण संख्याबळ २६ होते. अकोट नगरपालिकेत काँग्रेसचे सहा तर वंचित बहुजन आघाडीचे दोन नगरसेवक विरोधी बाकावर असणार आहेत.
दरम्यान, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या माया धुळे यांनी एमआयएमच्या उमेदवार फिरोजाबी सिकंदर राणा यांचा ५,२७१ मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीत भाजपनंतर सर्वाधिक पाच नगरसेवक एमआयएमचे निवडून आले आहेत. विधानसभा निवडणुकीदरम्यान ‘बटेंगे तो कटेंगे’ असा नारा देणाऱ्या भाजपने अकोटमध्ये थेट एमआयएमसोबत आघाडी केल्याने विरोधकांकडून तीव्र टीका होत असून, या टीकेला भाजप कसे उत्तर देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.






