BloodGroup : रक्तगट सांगतो तुमचा स्वभाव, कसं ते जाणून घ्या...
निरोगी आरोग्यासाठी तुम्हाला तुमचं रक्टगट माहित असणं गरजेचं आहे. अडचणीच्या प्रसंगी रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यासाठी सर्वात पहिले डॉक्टर रुग्णांच्या रक्तगटाची तपासणी करतात. त्यामुळे पुढील उपचार करणं सोपं जातं. त्याचप्रमाणे मजेशीर बाब म्हणजे असं म्हणताता की, तुमच्या रक्तगटावरुन तुमच्या स्वभावाचा अंदाज लावता येणं शक्य होतं. कसं ते जाणून घेऊयात.
असं म्हटलं जातं की, माणसाचा स्वभाव कळणं कठीण आहे. मात्र विज्ञानाने केलेल्या संशोधनात्मक अभ्यासामुळे एखाद्या व्यक्तीच्या स्बभावाचा अंदाज लावणं शक्य आहे. मानवी शरीर आणि मन यांचा एकमेकाशी थेट संबंध आहे. त्यामुळे तुम्ही काय खाता तसंचं तुमच्या शरीरातीूल चांगल्या वाईट बदलाचा तुमच्या मानसिकतेवर देखील परिणाम होतो, हे अभ्यासातून स्पष्ट झालं आहे.
O+ रक्तगट असलेल्या व्यक्तींचा मेंदू इतरांच्या तुलनेत झपाट्याने विकास होत असतो. ही माणसं अत्यंत कुशल व्यक्तीमत्त्वाची असातात. कायम सकारात्मक राहणं हे पसंत करतात. यांची त्यांच्या कामाप्रति अत्यंत निष्ठा असते.
या रक्तगटाची माणसं खूप कमी असतात. ही माणसं शांत आणि निर्मळ स्वभावाची असतात. .यांना संयमाने आणि शांततेने काम करण्याची आवड असते.व ही माणसं इतरांशी आदराने वागतात, तोच आदर समोरच्यानेही बोलताना आपल्याला द्यावा असं यांना वाटत असतं.
हेही वाचा-‘या’ पद्धतीने पाणी प्यायल्यास कमी वयात शरीरात जाणवतो सांधेदुखी, मुतखड्याचा त्रास
बऱ्याचदा अडचणीच्या काळात आपण समोरच्याला धिर देताना सगळं ठीक होईल बी पॉझिटीव्ह असं म्हणतो. तसाच हा रक्तगट देखील आहे. B+ रक्तगटाची माणसं कायमच सकारात्मक असतात. कठीण परिस्थितीतून बाहेर कसं पडाव यासाठी ते पुरेपुर प्रयत्न करतात. इतरांना मदत करणं त्यांना चांगलं जमतं.
या माणसांचा स्वभाव खूप कष्टाळू असतो. ही माणसं बोलण्यात वेळ वाया घालवत नाही. यांना वेळेची कदर असते. दिलेवल्या वेळेत काम पूर्ण करण्यासाठी ही माणसं दिवसरात्र एक करतात.
या रक्तगटाची माणसं धैर्यवान असतात. आपला मुद्दा पटवून द्यायचं कसब यांच्यात असतं. A+ रक्त गटाची माणसं समाजात फार लोकप्रिय असतात. उत्तम संवाद कौशल्य आणि अभ्यासपूर्ण केलेलं वक्तव्य या सगळ्या गुणांमुळे ही माणसं कलाकार आणि पुढारी असतात.
हेही वाचा-Colorectal Cancer: कोलोरेक्टल कॅन्सर का होतो? लक्षण, उपाय आणि कशी घ्यावी काळजी
या माणसांना कठीण परिस्थित काय करावं आणि कसं वागावं याचं भान असतं. ही माणसं संकटांमुळे प्रचंड खंबीर स्वभावाची असतात. रडत न बसता आहे त्यातून कसा मार्ग काढावा हे त्यांना माहित असतं. या माणसांना आपल्या दु:खाचं भांडवल केलेलं आवडत नाही.
ही माणसं इतराचं दु;ख समजून घेण्यात पटाईत असतात. त्यामुळे समाजात हे खूप चांगले सल्लागार देखील असतात. माणसं जोडण्याची कला यांना चांगली जमते.
ही माणंस गूढ स्वभावाची असतात. आपल्या मनात काय चाललंय याचा थांगपत्ता ही माणसं इतरांना लागू देत नाही. ही माणसं सहसा कोणावर लगेच विश्वास ठेवत. एखाद्याला मदत करताना यांचा हात मोकळा असतो.
(ही माहिती अभ्यासानुसार देण्यात आली आहे. या लेखातील सर्व माहिती ही वाचनासाठी असून ती तंतोतंत लागू होईल असं नाही. सामान्य ज्ञानासाठी ही माहिती वाचण्यात यावी.)