शिल्लक राहिलेल्या भातापासून काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा टेस्टी मंचुरियन
Breakfast Recipe: रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणात बऱ्याचदा भात शिल्लक राहतो. शिल्लक राहिलेल्या भात एकतर फ्रिजमध्ये ठेवला जातो आणि दुसऱ्या दिवशी त्यापासून फोडणीचा भात किंवा इतर पदार्थ बनवले जातात. पण नेहमीच शिल्लक राहिलेल्या भातापासून फोडणीचा भात किंवा मसाले भात खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही झटपट मंचुरियन बनवू शकता. चायनीज खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. चायनीज पाहिल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. त्यामुळे विकतचे मंचुरियन आणून खाण्यापेक्षा घरी बनवलेले टेस्टी आणि हेल्दी मंचुरियन खावेत. शेजवान चटणीसोबत मंचुरियनची चव अतिशय सुंदर लागते. घरातील उरलेले जेवण फेकून देण्याऐवजी त्यापासून विविध पदार्थ बनवून खावेत. चला तर जाणून घेऊया मंचुरियन बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)






