रात्री झोपताना अनेकांना उशी घेतल्याशिवाय झोप लागत नाही. मात्र हीच सवय तुमच्या आरोग्यासाठी घतक ठरु शकते.
ज्यांना सतत डोकेदुखीचा त्रास होतो त्यांनी उशी वापरु नये , उशी वापरल्याने मेंदूला रक्तपुरवठा होण्यात अडथळा येतो, असं जत्ज्ञ सांगतात.
झोपताना उशी घेतल्याने शांत झोप लागते, असं वाटत असलं तरी याने अनेक आजारांना आमंत्रण मिळतं असं, तज्ज्ञ सांगतात.
बऱ्याचदा असं होतं की उशांची आभ्रे खूप दिवस न धुतल्याने ती खराब झालेली असतात. या एका छोट्याशा चुकीचे परिणाम मात्र गंभीर असतात.
कधी कधी झोपेत एखादं वाईट स्वप्न पडतं आणि झोपमोड होते. त्यामुळे दिवसभारातील कामांवर याचा वाईट परिणाम दिसतो. याच कारण म्हणजे तुम्ही झोपताना घेत असलेली अस्वच्छ उशी.
काही जणांना जास्त उंचीची उशी घेतल्याशिवाय झोप लागत नाही. मात्र यामुळे मानेच्या व्याधी सुरु होतात. मान लचकणं यांसारख्य़ा समस्या जाणवतात.
ज्यांना सतत डोकेदुखीचा त्रास होतो त्यांनी उशी वापरु नये , उशी वापरल्याने मेंदूला रक्तपुरवठा होण्यात अडथळा येतो, असं जत्ज्ञ सांगतात.
जास्त उंचींच्या उशीमुळे मानेपासून पाठीपर्यंतच्या स्नायूंना त्रास होतो न स्पॉन्डिलोसिस होण्याचा धोका संभवतो.
शक्यतो, झोपताना उशी न वापरण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. पण जर तुम्हाला उशी घेऊन झोपायची सवय असेल तर, तुम्ही मध्यम उंचीची उशी निवडा, असं सांगितलं जातं.
तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार रात्री झोपताना तुमचा बेड आणि बिछाना स्वच्छ असायला पाहिजे. यामुळे चांगली झोप लागते.
मात्र जर तुम्हाला उशी शिवाय झोपच येत नसेल तर तुम्ही जास्त उंचीची उशी वापरण्याऐवजी मध्यम उंचीची वापरु शकता.