Beer Side Effects : उन्हाळ्यात बीअरची (Beer ) विक्री झपाट्याने वाढते. असे बरेच लोक आहेत ज्यांना वाटते की थंडगार बीअर प्यायल्याने उन्हाळ्याचा त्रास कमी होईल. मात्र, हे साफ चुकीचं आहे. बीअरमध्ये 5 ते 6 टक्के अल्कोहोल असते. उन्हाळ्यात हे प्यायल्याने डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरात कोरडेपणा वाढू शकतो. थंडगार बीअर प्यायल्याने शरीर आतून कोरडे होते.
बीअर प्यायल्यानंतर जास्त लघवी होते
अल्कोहोलमध्ये इथेनॉल असते, जे ADH (अँटी-लघवीचे प्रमाण वाढवणारा संप्रेरक) प्रतिबंधित करते आणि डायरेसिस सुरू होते. यामुळे डिहायड्रेशन वाढते. त्यामुळे फायदा होण्यापेक्षा नुकसान होण्याची शक्यताच जास्त
असते. त्यामुळे बीअर प्यायल्यानंतर लघवीचं प्रमाण वाढतं.
जास्त घाम येणे
उन्हाळ्यात शरीराचे तापमान कमी करण्यासाठी घाम येतो. बीअर प्यायल्याने शरीराचे तापमान झपाट्याने वाढू लागते, त्यामुळे जास्त घाम येणे सुरू होते. ही स्थिती शरीरातील पाण्याची कमतरता देखील वाढवते.
ही लक्षणे धोक्याची घंटा आहेत
असं म्हणतात की उन्हाळ्यात शरीरात पाण्याची खूप कमतरता असते, त्यामुळे चक्कर येणे, स्नायू दुखणे ही लक्षणे दिसू शकतात. मधुमेह, उच्च रक्तदाब आणि फुफ्फुस, यकृत, मूत्रपिंड, हृदयविकाराच्या रुग्णांना उन्हाळ्यात बीअर प्यायल्याने जास्त त्रास होतो.
कॉकटेल जास्त धोकादायक
कॉकटेलच्या स्वरूपात अल्कोहोल पिणे आणखी हानिकारक आहे. या अल्कोहोलिक पेयांमध्ये भरपूर साखर असते, ज्यामुळे ऑस्मोटिक डायरेसिस होऊ शकते. ही स्थिती शरीरासाठी अत्यंत धोकादायक आहे.
रिकाम्या पोटी बिअर पिण्याची चूक करू नका
पोट रिकामे असताना आणि तहान लागल्यावर तुम्ही बीअर पीत असाल तर त्रास सहन करण्याची तयारी ठेवा. कारण, रिकाम्या पोटी अल्कोहोल घेतल्याने ते रक्तात लवकर पोहोचते. उष्णतेसह इथेनॉलमुळे उष्माघात, आणि हायपरपायरेक्सिया यांसारख्या गंभीर आजाराचा धोका दुप्पट होतो.
त्यामुळे बीअर किंवा कॉकटेलच्या स्वरुपात असलेले अल्कोहोल इतर कोणत्याही ऋतूपेक्षा उन्हाळ्यात जास्त त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे शरीराला थंडावा देण्यासाठी आणि तहान भागवण्यासाठी स्वच्छ
आणि ताजे पाणी पिणंच केव्हाही चांगलंच.