ज्येष्ठ काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना पोटाच्या समस्येमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना पोटाच्या समस्या असल्याचे सांगितले जात आहे. डॉक्टर त्यांची प्रकृती गंभीर नसल्याचे सांगत आहेत.
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची प्रकृती गुरुवारी बिघडली. त्यांना सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, त्यांची प्रकृती ठीक असून डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे
कोरोना संसर्ग आणि त्यानंतरच्या आजारपणामुळे सोनिया गांधी या चौकशीसाठी हजर होऊ शकल्या नव्हत्या. या कारणामुळे त्यांनी चौकशीची वेळ बदलण्याची विनंती ईडीकडे केली होती. त्यापार्श्वभूमीवर आता त्या ईडीसमोर हजर राहणार आहेत.