वजन कमी करण्यासाठी प्रभावी उपाय
जगभरात वाढलेल्या वजनाच्या समस्येने अनेक लोक त्रस्त आहेत. वजन वाढल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. खाण्यापिण्याच्या चुकीच्या पद्धती, अपुरी झोप, शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता, अवेळी जेवणे, विटामिनची कमतरता इत्यादी गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. चुकीच्या पद्धतीने आहार फॉलो केल्यामुळे वजन झपाट्याने वाढू लागते. वजन वाढल्यानंतर मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल वाढणे इत्यादी आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे योग्य आहार फॉलो करून आरोग्याची काळजी घ्यावी. लठ्ठपणा वाढू लागल्यानंतर शरीरावर अतिरिक्त चरबी वाढू लागते. शरीरावर वाढलेली चरबी अनेकांसाठी त्रासदायक ठरते.(फोटो सौजन्य – iStock)
वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक महिला पुरुष तासनतास जिममध्ये जाऊन व्यायाम करणे, डाईट प्लॅन फॉलो करणे, डिटॉक्स ड्रिंक्स, अनेक वेगवेगळ्या प्रकारची औषध इत्यादी अनेक गोष्टी घेतल्या जातात. मात्र चुकीच्या पद्धतीने डाईट फॉलो केल्यामुळे वाढलेले वजन कमी होण्याऐवजी वाढू लागते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पोटावर वाढलेला घेर कमी करण्यासाठी आहारात कोणत्या फळाचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
वजन कमी करण्यासाठी आहारात अननसाचे सेवन करावे. अननसमध्ये असलेले घटक आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहेत. यामध्ये नैसर्गिकरित्या चरबी कमी करणारे घटक आढळून येतात. शरीरातील मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी आहारात अननसाचे सेवन करावे. बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी आहारात अननसाचे सेवन करावे. यासाठी तुम्ही अननसाचा रस पिऊ शकता. अननसामध्ये विटामिन सी आढळून येते. अननस खाल्यामुळे शरीरावर वाढलेली अतिरिक्त चरबी कमी होऊन पोट स्लिम होते.
शरीराचे मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी आहारात अननसाचे सेवन करावे. यामध्ये असलेले फायटोकेमिकल्स आणि अँटीऑक्सिडंट्स मेटाबॉलिझमला चालना देतात. स=तसेच शरीरावर वाढलेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी मदत होते. अननस खाल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. नियमित अननस किंवा अननसाचा रस प्यायल्यामुळे शरीराला अनेक प्रभावी फायदे होतात.
सोनू निगमला होतोय पाठदुखीचा त्रास! स्नायूंमध्ये क्रॅम्प आल्यास नक्की करा ‘हे’ घरगुती उपाय
बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी आहारात अननसाचे सेवन करावे. कारण यामध्ये डायटरी फायबर आढळून येते. बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी आहारात अननसाचे सेवन करावे. पचनशक्ती सुधारल्यामुळे शरीरावर अतिरिक्त चरबी साठून राहत नाही. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे. त्यामुळे पोट स्वच्छ होण्यासाठी आहारात अननसाचे सेवन करावे.