कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाशी पोटी करा या पदार्थांचे सेवन
चुकीची जीवनशैली, सतत होणारे वातावरणातील बदल, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, जंक फूडचे सेवन, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. सतत तेलकट किंवा तिखट पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्याची शक्यता असते. शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर नसांमध्ये पिवळ्या रंगाचा चिकट थर जमा होण्यास सुरुवात होते. नसांमध्ये जमा झालेला चिकट थर आरोग्याचे नुकसान करतो. यामुळे हृदयविकार आणि इतर आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीराच्या नसांमध्ये साचून राहिलेले कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी उपाशी पोटी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
मेथी दाण्यांचे सेवन केल्यामुळे शरीरात जमा झालेले खराब कोलेस्ट्रॉल कमी होते. यासाठी रात्री कोमट पाण्यात मेथी दाणे भिजत ठेवावे. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर पाण्यासोबतच मेथी दाणे चावून खावेत. यामुळे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. शिवाय यामध्ये असलेल्या फायबरमुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. नियमित मेथी दाण्यांचे पाणी प्यायल्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते, रक्तातील साखर वाढत नाही, पचनक्रिया सुधारते इत्यादी अनेक फायदे होतात.
बाजारात दोन प्रकारचे मनुके उपलब्ध आहेत. एक म्हणजे पिवळ्या रंगाचे मनुके आणि काळ्या रंगाचे मनुके. दोन्ही प्रकारचे मनुके आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत. यामध्ये नैसर्गिक गोडवा असतो ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत नाही. शिवाय अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यासाठी मदत करतात. यासाठी वाटीभर पाण्यात ५ ते ६ मनुके भिजत घालून सकाळी उठल्यानंतर मनुक्यांसह पाणी प्यावे. यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होईल.
विटामिन सी युक्त लिंबू पाण्याचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. त्वचेसंबंधित समस्यांपासून सुटका मिळते. उपाशी पोटी लिंबू पाण्याचे सेवन केल्यास शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडून जातात आणि खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू पिळून सकाळी उपाशी पोटी प्यावे. यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. तसेच पचनक्रिया सुधारून पोट बिघडणार नाही.
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
पोषक तत्वांनी समृद्ध असलेले बदाम आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत. यामध्ये हेल्दी फॅट्स, प्रोटीन, आणि अँटीऑक्सिडंट्स आढळून येतात. रात्री झोपण्याआधी 2 ते 3 बदाम पाण्यात भिजत घालावे. सकाळी उठल्यानंतर भिजवलेल्या बदामाचे सेवन करावे. यामुळे वाईट कोलेस्ट्रॉल कमी होईल, हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल.