अॅसिडिटी, पित्त वाढल्यास 'या' पदार्थांचे सेवन करा
सर्वच ऋतूंमध्ये शरीरात अॅसिडिटी वाढण्याची शक्यता असते. सतत बाहेरचे तेलकट किंवा तिखट पदार्थ खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन जातात. तसेच शरीरात अॅसिडिटीचे प्रमाण वाढल्यानंतर जळजळ होणे, अंगावर पित्त उठणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर हळूहळू आरोग्य बिघडण्यास सुरुवात होते. त्यामुळे आहारात कमी तेलकट आणि तिखट पदार्थांचे सेवन करावे. आयुर्वेदामध्ये तीन दोष सांगण्यात आले आहेत. त्यातील एक म्हणजे वात दोष, दुसरा म्हणजे पित्त दोष आणि आणि तिसरा म्हणजे कफ दोष. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये पित्त दोष मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीरातील पित्त आणि अॅसिडिटी कमी करण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
शरीरात वाढलेली जळजळ आणि अॅसिडिटी कमी करण्यासाठी आहारात थंड पदार्थांचे सेवन करा. त्यामध्ये तुम्ही ताक, दही, दूध, सरबत, फळांचा रस इत्यादी पदार्थांचे सेवन करू शकता. यामुळे तुमच्या शरोरातील जळजळ कमी होऊन आराम मिळेल. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी आणि पित्ताचा त्रास होऊ नये, म्हणून जेवणानंतर थंड पदार्थांचे सेवन करावे.
हे देखील वाचा: शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मधामध्ये मिक्स करा ‘या’ बिया, कोलेस्ट्रॉल होईल कमी
आयुर्वेदामध्ये शरीरात वाढलेले पित्त नियंत्रणात ठेवण्यासाठी तूप अतिशय फायदेशीर मानले जाते. तुपाचे सेवन केल्यामुळे शरीरात अॅसिडिटी आणि पित्ताचे प्रमाण कमी होते. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये तुपाचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीरात शीतलता मिळते. जेवणात किंवा इतर पदार्थ बनवताना तेलाचा वापर करण्याऐवजी तुम्ही तुपाचा वापर करू शकता. तूप खाल्ल्यामुळे अन्नपदार्थ सहज पचण्यास मदत होते.
पित्त आणि अॅसिडिटीपासून सुटका मिळ्वण्यासाठी आहारात तुम्ही फळे, भाज्यांचे सेवन करावे. त्यामध्ये तुम्ही कलिंगड, काकडी, पपई, मोसंबी, संत्रे इत्यादी फळांचे सेवन करू शकता. यामुळे पित्त आणि अॅसिडिटीचा त्रास कमी होतो. यामुळे शरीराला थंडावा मिळतो.