कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कलैंजी बिया आणि मध खावे
मानवी शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल आढळून येते. त्यातील एक म्हणजे चांगले कोलेस्ट्रॉल आणि दुसरे म्हणजे खराब कोलेस्ट्रॉल. शरीरात चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर आरोग्याला फायदे होतात. पण खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर बीपी, हृदयविकार, रक्तदाब इत्यादी आजार होण्याची शक्यता असते. शरीराच्या नसांमध्येसाचून राहिलेले खराब पिवळ्या रंगाचे पदार्थ आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत असतात. त्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी करण्याऱ्या पदार्थांचे आहारात सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला मधात कलौंजी बिया मिक्स करून खाल्ल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सांगणार आहोत.
सकाळी उठल्यानंतर कलैंजी बिया आणि मध खाल्ल्यास वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते. शरीरात वाढलेली अतिरिक्त चरबी कमी होऊन आरोग्य सुधारते. कलैंजी बिया खाल्ल्यामुळे शरीरातील चरबी कमी होऊन तुम्ही स्लिम दिसाल. कलैंजीमध्ये निजेलॉन नावाचे पोषक घटक सुद्धा आढळून येतात. यामुळे वेगाने वजन कमी होऊ लागते.
हे देखील वाचा: नारळाच्या दुधाने चेहरा धुण्याचे फायदे
हृद्य आणि रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी नियमित कलैंजी आणि मधाचे सेवन करावे. कलैंजीच्या बिया खाल्ल्यामुळे शरीरावरची अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. वाढलेल्या वजनासोबतच खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी या बिया मदत करतात. कलैंजीच्या बिया खाल्ल्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
रोगप्रतीकशक्ती वाढवण्यासाठी कलैंजी बिया आणि मधाचे सेवन करावे. तसेच थंडीच्या दिवसांमध्ये कलैंजी बिया आणि मध खाल्ल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. शरीरात होणारी जळजळ आणि सांधेदुखी, मज्जातंतूचे दुखणे कमी करण्यासाठी कलैंजी बिया खाव्यात.
हे देखील वाचा: हिमोग्लोबिन वाढविणारी 7 फळं, ठरतील संजीवनी
सत्ता काम करून किंवा इतर कारणामुळे शरीरात काहीवेळा हाडे दुखणे, सतत अंग दुखणे, हातापायांचे स्नायू दुखणे, काम करण्याची इच्छा न होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी रोजच्या आहारात मध आणि कलैंजीच्या बियांचे सेवन करावे. हे मिश्रण खाल्ल्यामुळे सांधेदुखी, मज्जातंतूचे दुखणे आणि स्नायू दुखणे इत्यादींच्या वेदनांपासून आराम मिळतो.