तुमचा पासपोर्ट साईज फोटो तयार करण्यासाठी स्टुडिओमध्ये जाण्याची गरज नाही. घरच्या घरीच तुम्ही काही सोप्या पद्धती वापरून पासपोर्ट साईज फोटो तयार करू शकता. या पद्धती तुम्ही लॅपटॉप किंवा फोनमध्येही वापरू शकता. फोटो तयार करण्यासाठी सर्वात आधी तुमचा फ्रंट फेसिंग फोटो क्लिक करा. त्यानंतर गूगल क्रोम ओपन करून १२३ पासपोर्ट फोटो वर जा. लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे कंट्री आणि फोटोच्या साईजचे ऑप्शन्स येतील. कंट्रीमध्ये तुम्ही भारत सिलेक्ट करा आणि तुमच्या गरजेनुसार साईज सिलेक्ट करून तुम्ही बॅकग्राऊंडसुद्धा चेंज करू शकता.
तयार झालेला फोटो फ्री सेव्ह करण्यासाठी तुम्हाला तो तुमच्या फेसबुक अकाऊंटवर शेअर करावा लागेल. तर तुम्ही त्या फोटोला सीन ओन्ली मी अशी सेटिंग करून शेअर करू शकता आणि मग या फोटोची प्रिंट काढून घेऊ शकता. जर तुम्हाला फोटोशॉप हे ऍप्लिकेशन वापरता येत असेल तर लॅपटॉपवर हे ऍप्लिकेशन उघडा. त्यामध्ये तुमचा आधी काढलेला फोटो ओपन करा. त्या फोटोचा तुम्हाला आवडेल तो कलर ऍडजस्ट करा आणि त्या फोटोला पासपोर्ट साईजमध्ये ऍडजस्ट करा. याव्यतिरिक्त हल्ली मोबाईलमध्ये प्ले स्टोअरवर असे कितीतरी ऍप्लिकेशन्स उपलब्ध असतात ज्यांच्या साहाय्याने तुम्ही तुमचे हवे तसे फोटो तयार करू शकता.