Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ विटामिनच्या कमतरतेमुळे केसांमध्ये वाढू शकतो कोंडा! केसांचे होईल गंभीर नुकसान

केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर अनेक लोक या समस्येकडे दुर्लक्ष करतात. मात्र असे न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. आज आम्ही तुम्हाला कोणत्या विटामिनच्या कमतरतेमुळे केस गळतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 08, 2025 | 09:53 AM
'या' विटामिनच्या कमतरतेमुळे केसांमध्ये वाढू शकतो कोंडा!

'या' विटामिनच्या कमतरतेमुळे केसांमध्ये वाढू शकतो कोंडा!

Follow Us
Close
Follow Us:

शरीरात विटामिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्यासह केस आणि त्वचेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. विटामिनच्या कमतरतेमुळे केस गळणे, केसांमध्ये कोंडा होणे, केस अचानक तुटणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर महिला केसांच्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट करणे, हेअर मास्कचा वापर, केमिकलयुक्त शँम्पू इत्यादी अनेक गोष्टींचा वापर केला जातो. मात्र यामुळे केसांची गुणवत्ता खराब होण्याची शक्यता असते. सुंदर आणि लांबलचक केसांसाठी केसांना वरून पोषण देण्याऐवजी आतून पोषण देणे आवश्यक आहे. यामुळे केसांची वाढ चांगली होऊन केस सुंदर आणि मजबूत होतात. केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी केसांना पोषणाची आवश्यकता असते.(फोटो सौजन्य – iStock)

चेहऱ्यावरची लटकटी सैल त्वचा क्षणात होईल घट्ट; फक्त या मास्कचा वापर करा, काही दिवसांतच चेहरा दिसू लागेल तरुण

आहारात पोषक तत्वांचा अभाव निर्माण झाल्यानंतर केसांमधील आवश्यक घटक कमी होऊन जातात. केसांच्या वाढीसाठी विटामिन बी 2, बी 3 , बी 6 , बी9  इत्यादी घटक आवश्यक असतात. मात्र शरीरात याचं विटामिनचा अभाव निर्माण झाल्यानंतर केस तुटणे किंवा केस गळण्याची समस्या उद्भवू लागते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीरात कोणत्या विटामिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर केसांमध्ये कोंडा वाढतो, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

विटामिन बी 2:

शरीरात विटामिन बी 2 ची कमतरता निर्माण झाल्यानंतर केसांमध्ये मोठ्या प्रमाणात कोंडा होतो. या विटामिनला रिबोफ्लेविन असे देखील म्हणतात. हे विटामिन त्वचा आणि केसांसाठी अतिशय महत्वाचे आहे. मात्र शरीरात विटामिन बी 2 ची कमतरता निर्माण झाल्यास टाळूला खाज सुटणे, जळजळ होणे आणि कोरडेपण इत्यादी अनेक समस्या वाढू लागतात. त्यामुळे विटामिन बी 2 ची कमी झालेली कमतरता वाढवण्यासाठी आहारात दूध, अंडी, हिरव्या भाज्या आणि काजू इत्यादी पदार्थ खावेत.

विटामिन बी 3:

विटामिन बी 3 ला नियासिन असे म्हणतात. या विटामिनमुळे शरीराचे रक्तभिसरण सुधारते आणि त्वचेमधील आर्द्रता कायम टिकून राहते. मात्र या विटामिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर टाळूला सूज येणे, खाज सुटणे, इन्फेक्शन इत्यादी अनेक समस्या वाढू लागतात. त्यामुळे आहारात मासे, चिकन, कडधान्ये इत्यादी पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे विटामिन बी 3 ची कमतरता भरून निघेल.

सैल आणि लटकलेल्या स्तनांमुळे त्रस्त आहात? नियमित करा ‘हे’ व्यायाम प्रकार, स्तनांचा आकार होईल कमी

विटामिन बी 6:

केसांच्या वाढीसाठी विटामिन बी 6 अतिशय महत्वाचे आहे. या विटामिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर टाळूवर जळजळ होणे, खाज सुटणे किंवा इन्फेक्शनचा धोका वाढू लागतो. त्यामुळे शरीरात कमी झालेली विटामिनची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात मासे, शेंगदाणे, सोयाबीन, गहू, ओट्स, केळी, बटाटे, पालक, पालेभाज्या इत्यादींचे सेवन करावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Dandruff can develop in the hair due to lack of this vitamin hair fall reasons hair care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2025 | 09:49 AM

Topics:  

  • hair care tips
  • hair fall reason
  • home remedies

संबंधित बातम्या

तुमचेही केस झाडूसारखे कोरडे झाले आहेत का? हे 6 संकेत सांगतात… केसांत जास्त झालंय ब्लीचचं प्रमाण
1

तुमचेही केस झाडूसारखे कोरडे झाले आहेत का? हे 6 संकेत सांगतात… केसांत जास्त झालंय ब्लीचचं प्रमाण

Curry Leaves: वेटलॉस ते ब्लड शुगर कंट्रोल; कढीपत्ता आरोग्यासाठी वरदान, वाचा अद्भुत फायदे
2

Curry Leaves: वेटलॉस ते ब्लड शुगर कंट्रोल; कढीपत्ता आरोग्यासाठी वरदान, वाचा अद्भुत फायदे

उन्हाळ्यात घामामुळे केस चिकट आणि तेलकट होऊन जातात? ‘या’ पद्धतीने घ्या केसांची काळजी, केस राहतील स्वच्छ
3

उन्हाळ्यात घामामुळे केस चिकट आणि तेलकट होऊन जातात? ‘या’ पद्धतीने घ्या केसांची काळजी, केस राहतील स्वच्छ

Hair Care Tips: १० रुपयांमध्ये केस होतील चमकदार आणि काळेभोर! घरीच सोप्या पद्धतीमध्ये तयार करा नॅचरल रिठा शाम्पू
4

Hair Care Tips: १० रुपयांमध्ये केस होतील चमकदार आणि काळेभोर! घरीच सोप्या पद्धतीमध्ये तयार करा नॅचरल रिठा शाम्पू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.