स्तनांचा आकार कमी करण्यसाठी व्यायाम प्रकार
जगभरात वाढलेल्या वजनामुळे महिलांसह पुरुष देखील त्रस्त आहेत. वजन वाढल्यानंतर आरोग्याला हानी पोहचू लागते. शरीरात होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. वजन वाढल्यानंतर शरीरावर अतिरिक्त चरबी वाढू लागते. या चरबीमुळे मधुमेह, कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब इत्यादी गंभीर आजार वाढू लागतात. याशिवाय वजन वाढल्यानंतर महिलांच्या शरीरात अनेक बदल होऊ लागतात. महिलांचे स्तन ओघळून सैल आणि लटकल्यासारखे दिसू लागतात. याशिवाय पोट आणि कंबरेभोवती चरबीचा घेर वाढू लागतो. पाठ आणि हातांच्या दंडांवर वाढलेल्या अतिरिक्त चरबीमुळे स्तन खाली आल्यासारखे वाटू लागतात. म्हणून आज आम्ही तुम्हाला लटकलेल्या स्तनांचा आकार सुधारण्यासाठी काही व्यायाम प्रकार सांगणार आहोत. हे व्यायाम नियमित केल्यास स्तनांचा आकार कमी होईल.(फोटो सौजन्य – iStock)
गरोदरपणात बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा तात्काळ आराम
स्तनांचा आकार कमी करण्यासाठी तुम्ही सकाळी उठल्यानंतर नियमित व्यायाम प्रकार करू शकता. यामुळे तुमच्या शरीराला देखील अनेक फायदे होतील. स्तनांचा आकार कमी करण्यासाठी सुपरमॅन पोज करावी. यासाठी सगळ्यात आधी जमिनीवर झोपा. हात लांब करून वरच्या दिशेला खेचा आणि पाय खालच्या दिशेला खेचून धरा. १ मिनिटं व्यायाम प्रकारात राहिल्यानंतर पुन्हा एकदा सामान्य स्थितीमध्ये यावे. यामुळे शरीरातील स्नायूंमध्ये ताण निर्माण होईल आणि स्तनांचा आकार कमी होईल.
वजन वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. स्तनांचा आकार बिघडल्यानंतर तो सुधारण्यासाठी धनुरासन मुद्रा करावी. यासाठी सर्वप्रथम योगा मॅटवर पोटावर झोपा. त्यानंतर दोन्ही हातानी पाय वरच्या दिशेला धरून नंतर मन वर करा. ३० सेकंड या स्थितीमध्ये राहिल्यानंतर सामान्य स्थितीमध्ये यावे. हा व्यायाम प्रकार नियमित केल्यास पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होण्यासोबतच अनेक समस्यांपासून आराम मिळेल.
पोटावर वाढलेली चरबीचा घेर कमी करण्यासाठी मार्जारियासन करावे. या आसनांमुळे शरीराला अनेक फायदे होतात. मार्जारियासन करताना सगळ्यात आधी, मॅटवर झोपा. त्यानंतर गुडघे कंबरेजवळ घेऊन दोन्ही हात जमिनीला टेकवा आणि ३० सेकंड या स्थितीमध्ये राहा. यामुळे पाठीचा कणा आणि कंबरेभोवती वाढलेली अतिरिक्त चरबी कमी होईल आणि आराम मिळेल.
गर्भाशय काढल्यानंतर मासिक पाळी येते का? जाणून घ्या मासिक पाळीचा आरोग्यावर होणारा परिणाम
त्वचा आणि आरोग्य सुधारण्यासाठी धूम्रपान करणे टाळावे. सतत सिगारेट किंवा अमली पदार्थांचे सेवन केल्यामुळे त्वचेवर सुरकुत्या पडणे, शरीरातील अवयवांना इजा होणे, फुफ्फुसांचा कॅन्सर इत्यादी अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी धूम्रपान करणे टाळावे. त्याऐवजी शरीराला आवश्यक असलेल्या पदार्थांचे सेवन करा.