(फोटो सौजन्य: istock)
वाढत्या वयाबरोबर आपल्या चेहऱ्यावरही अनेक बदल दिसून येतात. यातील सामान्य आणि दिसून येणारा बदल म्हणजे चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागणे. वाढत्या वयाबरोबरच आपल्या चेहऱ्यावर काही बारीक रेषा दिसू लागतात. चेहऱ्यावर दिसून येणारे हे बदल तुमच्या वृद्धत्वाचे संकेत देत असतात. परंतु योग्य काळजी घेतल्यास चेहऱ्यावरचे हे वृद्धत्व कमी केले जाऊ शकते. तुम्ही पाहिले असेल की अनेक सेलिब्रिटीज वृद्धत्वातही फार सुंदर दिसतात, त्यांच्या चेहऱ्यावर एक रेघही दिसून येत नाही. चेहऱ्याची योग्य काळजी घेतल्यास तुम्हीही तुमच्या चेहऱ्याचे तारुण्य जपून ठेवू शकता.
यासाठी आहारात काही गोष्टींचा समावेश करणे फायद्याचे ठरेल, यामुळे शरीरातील कोलेजन वाढते. कोलेजनमुळे आपल्या त्वचेला लवचिकता येते. आम्ही तुम्हाला सांगतो की, रोज आपल्या आहारात आवळा आणि लिंबू पाण्याचा समावेश केल्याने चेहऱ्याचे तारुण्य अधिक काळ टिकून राहते आणि यामुळे चेहरा निरोगी राहतो. तसेच यात पांढऱ्या तिळाचा वापर करून तुम्ही मास्क तयार करू शकता. हा मास्क त्वचेसाठी नैसर्गिक बूस्टर म्हणून काम करेल आणि त्वचेची लवचिकता परत मिळवण्यास मदत करेल. तुम्ही हा मास्क घरीच अगदी सहज तयार करू शकता.
फ्रीजमध्ये ठेवताच विषाचे रूप घेतात ‘या’ भाज्या; कधीही ही चूक करू नका, वेळीच व्हा सावध
साहित्य
अशाप्रकारे चेहऱ्यावर लावा
वर नमूद केलेले तिन्ही साहित्य एकत्र मिक्सरमध्ये टाकून चांगले बारीक करा. बारीक केल्यानंतर याचे मिश्रण तयार होईल. आता हे मिश्रण एका काचेच्या भांड्यात ठेवा आणि त्यात 1 चमचा मध घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर पेस्टप्रमाणे लावा. आता चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा. मसाजसाठी, तुमचा अंगठा काढून मुठीसारखा बनवा आणि हनुवटीच्या भोवतीची त्वचा वरच्या बाजूला लिफ्ट करा. मसाज करण्यासाठी तुमच्या बोटांचे जॉइंट्सचा वापर करा. संपूर्ण चेहऱ्याला 10 मिनिटे मसाज केल्यानंतर, चेहऱ्यावर मास्कचा एक जाड थर लावा.
दारू पिणाऱ्या महिलांचा ‘या’ धोकादायक आजारांमुळे होऊ शकतो मृत्यू, वेळीच सावध व्हा
अशाप्रकारे चेहऱ्यावरून मास्क काढा
मास्क लावल्यानंतर अर्धा तास तो चेहऱ्यावर ठेवा. मास्क वाळल्यानंतर चेहरा पाण्याने हलका ओला करून स्क्रबप्रमाणे स्वच्छ करा. आता स्वच्छ पाण्याने चेहरा धुतल्यानंतर वाफ घ्या. स्टीमरमध्ये काही पुदिन्याची पाने घाला आणि चेहऱ्यावर टॉवेल ओढून चेहऱ्याला काहीवेळ वाफ द्या. नंतर चेहऱ्यावरील टॉवेल काढून टाका. हे असे आठ्वडातून तीनदा करा. याच्या नियमित वापराने तुम्हाला नक्कीच चेहऱ्यावर फरक जाणवू लागेल.
टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.