दीपिका पदुकोण लग्नाआधी ग्लोइंग त्वचेसाठी नियमित करत होती 'या' पेयाचे सेवन
लग्न सराईच्या दिवसांमध्ये त्वचेची जास्त काळजी घ्यावी लागते. त्वचेवर आलेले पिंपल्स, फोड, मुरूम कमी करण्यासाठी अनेक मुली डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करतात. मात्र काही वेळा गोळ्या औषधांमुळे त्वचेची गुणवत्ता आणखीनच खराब होऊन जाते. अशावेळी त्वचेची काळजी घेण्यासाठी घरगुती पेयांचे सेवन करावे. बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण तिच्या अभिनयामुळे सगळीकडे प्रसिद्ध आहे. तसेच तिच्या सौंदर्याचे अनेक चाहते सुद्धा आहेत. तिने लग्न होण्याच्या तीन महिने आधीपासून त्वचेची काळजी घेण्यासाठी आहारात घरगुती पेयांचे सेवन करण्यास सुरुवात केली होती. या पेयाच्या सेवनामुळे तिची त्वचा अतिशय सुंदर आणि चमकदार झाली होती. या ज्युसच्या सेवनामुळे लग्नाच्या दिवशी तिची त्वचा अगदी सुंदर, ग्लोइंग, चमचमती दिसत होती. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला लग्न होण्याआधी सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी दीपिका कोणत्या पेयाचे सेवन करत होती, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
दीपिका पदुकोण सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी लग्नाआधी घरगुती पदार्थांपासून तयार करण्यात आलेल्या पेयाचे सेवन करत होती. घरगुती पदार्थांचा आहारात समावेश केल्यामुळे त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार दिसते. याशिवाय त्वचेवर नैसर्गिक सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी आहारात बीट, गाजर आणि विटामिन सी युक्त पदार्थांचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया ज्युस बनवण्याची सोपी रेसिपी.
मिक्सरच्या भांड्यात पुदिन्याची पान, कोथिंबीर, कडुलिंबाची पाने, कढीपत्ता, बीटरुटचे तुकडे घेऊन त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. त्यानंतर तयार केलेल्या ज्युसमध्ये थोडस पाणी घालून मिक्स करा. तयार केलेल्या ज्युसचे नियमित सेवन केल्यास त्वचेसह आरोग्याला अनेक फायदे होतील. लग्नाआधीचे तीन महिने बीटच्या रसाचे नियमित सेवन केल्यास त्वचा, केस आणि आरोग्याला अनेक फायदे होतील.
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
बीटरूटच्या रसाचे सेवन केल्यामुळे त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार दिसते. हा ज्यूस पुदिन्याची पान, कोथिंबीर, कडुलिंबाची पाने, कढीपत्ता इत्यादी गुणकारी पदार्थ एकत्र करून तयार करण्यात आला आहे. बीटचे सेवन केल्यामुळे शरीरात लोहाची पातळी वाढते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. कडुलिंबाच्या पानांमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे शरीरात साचून राहिलेली घाण स्वच्छ होते आणि त्वचेवर आलेले डाग, पिंपल्स कायमचे निघून जातात. हा ज्यूस त्वचा आणि केसांसाठी अतिशय फायदेशीर आहे. चेवर आलेल्या बारीक रेषा, सुरकुत्या घालवण्यासाठी बीट मदत करते. विटामिन सी च्या सेवनामुळे त्वचेवर आलेलोए काळे डाग कमी होऊन त्वचा तरुण आणि चमकदार दिसते.