कढीपत्ता आणि बीट रस बनवण्याची पद्धत
केसांच्या निरोगी वाढीसाठी महिला सतत काहींना काही उपाय करत असतात. मात्र चुकीच्या पद्धतीने केलेल्या उपायांमुळे केसांचे नुकसान होण्याची शक्यता असते. थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्यासोबत त्वचा आणि केस सुद्धा अधिक कोरडे आणि निस्तेज होऊन जातात. केसांमध्ये मोठ्या प्रमाणात कोंडा होणे, केस सतत गळणे, केस तुटणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेले वेगवेगळे हेअर केअर प्रॉडक्ट लावतात. मात्र त्याचा फारसा परिणाम केसांवर दिसून येत नाही. अशावेळी केसांच्या घनदाट आणि निरोगी वाढीसाठी आहारात बीट आणि कढीपत्त्याचे सेवन करावे.(फोटो सौजन्य – iStock)
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
बीटमध्ये विटामिन ए आणि फोलेट इत्यादी अनेक घटक आढळून येतात. ज्यामुळे त्वचा आणि केसांना अनेक फायदे होतात. शरीरात कमी झालेली रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात बीटचे सेवन करावे. लोहाची कमतरता निर्माण झाल्यानंतर बीटचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय केसांच्या वाढीसाठी बीटचे नियमित सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला बीट कढीपत्याचा रस बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत? या रसाचे सेवन केल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, जाणून घेऊया सविस्तर.
सर्वप्रथम, कढीपत्ता बीटचा रस बनवण्यासाठी टोपात अर्धा लिटर पाणी गरम करण्यासाठी ठेवा. त्यानंतर त्यात बीटचे बारीक तुकडे कापून टाका. १५ मिनिटं बीट व्यवस्थित उकल्यानंतर एक चमचा आल्याची पेस्ट आणि मूठभर कढीपत्त्याची पाने घालून मिक्स करून घ्या. २ ते ३ मिनिटं सर्व मिश्रण व्यवस्थित उकळल्यानंतर गॅस बंद करून रस थंड होण्यासाठी ठेवा. त्यानंतर पाणी घालून त्यातील सर्व पदार्थ बाजूला काढून मिक्सरच्या भांड्यात बारीक वाटून घ्या. तयार केलेल्या रसाचे सेवन करा. यामुळे त्वचेला अनेक फायदे होतील.
शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आहारात बीट आणि कढीपत्त्याचे सेवन करावे. यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. बीटमध्ये विटामिन सी मुबलक प्रमाणात आढळून येते. याशिवाय कढीपत्त्याची पाने खाल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. रोगापासून शरीराचा बचाव करण्यासाठी नियमित बीट कढीपत्त्याच्या रसाचे सेवन करावे. बीट कढीपत्त्याचा रस शरीर डिटॉक्स करण्यासाठी मदत करतो.
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
केस गळती किंवा केसांच्या तुटण्यापासून आराम मिळवण्यासाठी नियमित बीटच्या रसाचे सेवन करावे. हा रस आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. बीटमध्ये विटामिन ए, प्रथिने आणि कॅरोटीनोइड्स इत्यादी घटक आढळून येतात, ज्यामुळे केसांची मूळ मजबूत होतात आणि केस तुटण्याच्या समस्येपासून आराम मिळतो.