डायबिटीस असून सुद्धा Shardiya Navratri 2024 मध्ये उपवास करायचा आहे? तर मग द्या या गोष्टींकडे विशेष लक्ष
भारतीय संस्कृती आणि माणसांना बांधून ठेवणारे सण, ही आपल्या देशाची ओळख आहे. दिवाळी असो की होळी, या अशा सणांमुळे आपण आपल्या व्यस्त जीवनातून थोडा ब्रेक घेतो आणि आपल्या माणसांसोबत वेळ घालवतो. असे कित्येक सण आहेत ज्यामुळे आपले जीवन अधिकच आनंददायी होते.
गणेशोत्सव झाल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला वेध लागते ते नवरात्रीचे. नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजे दुर्गा देवीची केलेली आराधना. नवरात्र हा सण देशाच्या कानाकोपऱ्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या काळात अनेक जण नऊ दिवस उपवास करताना दिसतात. काही जण तर या काळात चप्पल घालणे सुद्धा सोडून देतात.
आपल्याकडे उपवासाला केवळ धार्मिक महत्त्व नाही, तर आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही ते खूप फायदेशीर मानले जाते. उपवासामुळे पचनक्रिया सुधारते, ज्यामुळे शरीर अधिक चांगल्या प्रमाणात अन्न पचन करते, ज्यामुळे आपल्याला अधिक पोषक तत्व मिळतात.
हे देखील वाचा: संगीताचा बागेवर होतो चांगला परिणाम; फुलून जातो बगीचा, संशोधनामध्ये झाले सिद्ध
मात्र, ज्याप्रमाणे नाण्याला दोन बाजू असतात त्याचप्रमाणे उपवासाचेही फायदे आणि तोटे आहेत. विशेषत: जर तुम्ही डायबिटीससारख्या आजाराने त्रस्त असाल तर उपवास करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही डायबिटीसने त्रस्त असाल आणि तरीही उपवास करत असाल, तर तुम्ही कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे, याबद्दल जाणून घेऊया.
कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट निवडा: जेव्हा तुम्ही जेवण जेवता तेव्हा तुमच्या आहारात संपूर्ण धान्य, तपकिरी तांदूळ आणि ओट्स यांसारख्या कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सचा समावेश करा. कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
अति प्रमाणात खाणे टाळा: उपवासात तुमच्या खाण्याच्या सवयीनवर नियंत्रण ठेवा. उपवास सोडताना जास्त पदार्थ खाऊ नका, अन्यथा रक्तातील साखर वाढू शकते.
नेहमी हायड्रेटेड राहा: उपवासात हायड्रेटेड राहणे खूप महत्वाचे आहे. यासाठी दिवसभर भरपूर पाणी प्या, कारण डिहायड्रेशनमुळे रक्तातील साखरेची पातळी प्रभावित होऊ शकते.
तुमच्या आहारात प्रोटिन्सचा समावेश करा: तुमच्या आहारात कमी चरबीयुक्त डेअरी उत्पादने, नट आणि बिया यांसारख्या प्रोटीन स्त्रोतांचा समावेश करा, ज्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहील.
तुमच्या ब्लड शुगरवर लक्ष ठेवा: जर तुम्ही नऊ दिवस उपवास करत असाल, तर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियमितपणे तपासा जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमची रक्तातील साखर नियंत्रणात आहे की नाही.