
शरीराच्या कोणत्याही अवयवांवर आलेल्या पाणीदार फोड्यांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष!
जननेंद्रियाची नागीण झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?
जननेंद्रियाची नागीण म्हणजे काय?
संसर्गजन्य आजारांची लागण होऊ नये म्हणून काय करावे?
कोणत्याही वयात शरीराला गंभीर आजारांची लागण होऊ शकते. त्यामुळे कायमच हेल्दी राहणे आवश्यक आहे. बऱ्याचदा शरीरसंबंधित उद्भवणाऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जाते. असे केल्यामुळे अतिशय लहान आजार कालांतराने गंभीर स्वरूप घेतात आणि शरीराला हानी पोहचून कोणत्याही क्षणी मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे शरीरात दिसून येणाऱ्या छोट्या मोठ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तातडीने उपचार करणे आवश्यक आहे. शरीराच्या कोणत्याही अवयवांवर आलेले लहान मोठे बारीक फोड पाहिल्यानंतर उष्णतेची किंवा इन्फेक्शन झाले असेल समजून दुर्लक्ष केले जाते. पण असे न करता वेळीच उपचार करावेत. ऍलर्जी किंवा बुरशीजन्य संसर्गाची लगेच समजून येतात. शरीरावर आलेले लहानलहान पाणीदार फोड मुरूम किंवा पिंपल्सचे नसून जननेंद्रियाच्या नागीण संसर्गाचे लक्षण आहे. या आजाराची लागण झाल्यानंतर शरीराच्या कोणत्याही अवयवावर लहान पाणीदार फोड येतात. हा संसर्ग हळूहळू शरीराच्या इतर भागांवर सुद्धा पसरतो. चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)
जगात प्रत्येक सेकंदाला एका व्यक्तीला जननेंद्रियाच्या नागिणीची लागण होते. हा आजार व्हॅरिसेला झोस्टर विषाणूमुळे होतो. कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला या विषाणूची लागण होऊ शकते. त्यामुळे संसर्गजन्य आजाराची लागण झाल्यानंतर अतिशय सावधगिरी बाळगून योग्य औषध उपचार करणे आवश्यक आहे. असे मानले जाते की, ज्या व्यक्तींनी कांजण्या, व्हॅरिसेला झोस्टर विषाणूची लागण आधीच झाली असेल अशांना नागीण झाल्यानंतर खूप जास्त त्रास होतो. दरवर्षी ४२ दशलक्ष लोकांना जननेंद्रियाच्या नागिणीची लागण होते.
जननेंद्रियाची नागीण झाल्यानंतर शरीराच्या कोणत्याही अवयवार वेदनादायक फोड आणि अल्सर येण्याची शक्यता असते. पाणीदार फोड आल्यानंतर खूप जास्त जळजळ आणि त्वचेला खाज येते. हा संसर्ग वाढू लागल्यानंतर हळूहळू शरीराच्या इतर भागांवर सुद्धा होतो. वारंवार येणाऱ्या पाणीदार फोड्यांमुळे अस्वस्थता वाढून शरीराचे गंभीर नुकसान होण्याची शक्यता असते. 2020 मध्ये 200 दशलक्षाहून अधिक लोकांना जननेंद्रियाच्या नागिणीची लागण झाली होती. जननेंद्रियांची नागीण झाल्यानंतर योग्य वेळी उपचार न केल्यास मृत्यू होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे शरीरात दिसून येणाऱ्या गंभीर लक्षणांना दुर्लक्ष न करता उपचार करून आराम मिळवावा.
Ans: हर्पिस सिम्प्लेक्स व्हायरस (HSV) मुळे होणारा संसर्ग आहे.
Ans: संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या थेट त्वचेच्या संपर्कातून हा आजार पसरतो.
Ans: त्वचेवर वेदनादायक फोड किंवा व्रण येतात.